... अन्यथा तपोवन रोड जेसीबीने उखडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:19 AM2021-02-07T04:19:24+5:302021-02-07T04:19:24+5:30

यावेळी इंजि. भाग्येश शिंदे, संतोष पवार, विनोदसिंग परदेशी, अजित धस, प्रकाश बेरड, पप्पू येवले, गुरुनाथ क्षेत्रे, चंदू टाके, ऋषी ...

... otherwise Tapovan Road will be uprooted by JCB | ... अन्यथा तपोवन रोड जेसीबीने उखडू

... अन्यथा तपोवन रोड जेसीबीने उखडू

यावेळी इंजि. भाग्येश शिंदे, संतोष पवार, विनोदसिंग परदेशी, अजित धस, प्रकाश बेरड, पप्पू येवले, गुरुनाथ क्षेत्रे, चंदू टाके, ऋषी ढवण, रोहन ढवण, अभिषेक गवळी, प्रकाश भोडवे, योगेश्‍वर गागरे, सिध्दार्थ सांगळे, अशोक शिंदे, बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

शहरातील तपोवन रोडचे काम मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत सुरू करण्यात आले होते. कामपूर्तीनंतर कंत्राटदारामार्फत पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची हमी होती. परंतु या रस्त्याचे काम होऊन अवघे आठ दिवस झाल्यानंतर रस्ता ठिकठिकाणी पूर्णपणे उखडला. त्यानंतर पुन्हा खडी टाकून पॅचिंगचे काम करण्यात आले. मात्र रस्त्याची अवस्था पुन्हा खड्डेमय झाली आहे. कोट्यवधी रुपयांचे काम होऊनदेखील सर्व पैसे पाण्यात गेले. या निकृष्ट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

चौकशी करून पुन्हा दर्जेदार पध्दतीने काम न केल्यास हा रस्ता जेसीबीने खोदून शेवटचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

--------

फोटो - ०६प्रहार निवेदन

तपोवन रोडचे काम निकृष्ट झाले असून, या या कामाची चौकशी करून पुन्हा रस्त्याचे काम होण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांना देण्यात आले.

Web Title: ... otherwise Tapovan Road will be uprooted by JCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.