चारशेपेक्षा जास्त गुन्हेगार होणार हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 01:35 PM2018-11-03T13:35:46+5:302018-11-03T13:35:49+5:30
महानगरपालिका निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये
अहमदनगर : महानगरपालिका निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चारशेपेक्षा जास्त जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केले जाणार आहेत तसेच इतर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले़
९ डिसेंबर रोजी महापालिका निवडणूक होत आहे़ महापालिकेच्या केडगाव येथील पोटनिवडणुकीत ७ एप्रिल रोजी राजकीय वादातून दोघा शिवसैनिकांची हत्या झाली़ हे हत्याकांड राज्यभर गाजले़ येणाºया निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सफाई मोहीम हाती घेतली आहे़ ज्यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत त्यांचाही हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे़
तसेच इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे़ या हद्दपारीच्या कारवाईत केडगाव हत्याकांडानंतर केडगाव येथे व पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड करणाºया बहुतांशी जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे़ गुन्हेगारी घटनांमध्ये सक्रिय असणाºयांची संबंधित पोलीस ठाण्यांनी यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे़
दिवाळी सणानिमित्त शहरात गस्त वाढणार
४दिवाळी सणानिमित्त बाजारात मोठी गर्दी होत आहे़ या गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांचे दागिने व पाकिटमारी करत आहेत़ तसेच धूमस्टाईल चोºयाही सुरू आहेत़ ४ ते ८ नोव्हेंबर पर्यंत शहरात पोलिसांचे गर्दीच्या ठिकाणी व चौकाचौकात फिक्स पॉर्इंट लावण्यात येणार असून, गस्तही वाढविण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले़