अडचणींवर मात करीत तनपुरेचे ६५ हजार मेट्रिक टन गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:18 AM2021-02-08T04:18:25+5:302021-02-08T04:18:25+5:30
तनपुरे कारखाना अशोक सहकारी साखर कारखान्याकडून ऊस आणत आहे. कारखाना वारंवार बंद पडत असल्याने कामगार निघून ...
तनपुरे कारखाना अशोक सहकारी साखर कारखान्याकडून ऊस आणत आहे. कारखाना वारंवार बंद पडत असल्याने कामगार निघून गेले होते. आता सोलापूरवरून टोळ्या आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तनपुरे सहकारी साखर कारखाना चांगले उत्पादन करीत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची नोंदणी तनपुरे कारखान्याकडे केली होती. मात्र, कारखाना बंद पडल्याने शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्य साखर कारखान्यांना ऊस देणे पसंत केले. तनपुरे कारखाना बंद पडल्याने ऊस तोडणी कामगारांनी शेतकऱ्यांची लूट केली. शेतकऱ्यांकडून एकरी पाच हजार रुपयांनी वसुली केली. कारखाना बंद पडल्याने शेतकऱ्यांना उशिरा गहू, हरभरा, कांदा, घास व अन्य पिकांची लागवड करावी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. साखर कारखाना कायमस्वरूपी चालू रहावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. प्रसाद शुगर राहुरी सहकारी साखर कारखाना हे दोन्ही साखर कारखाने जर नियमित चालले तर शेतकऱ्यांची होणारी कोंडी फुटण्यात मदत होते.
..........
तनपुरे सहकारी साखर कारखाना दररोज ३६०० ते ३७०० मेट्रिक टन ऊसाचे गाळप करीत आहे. कारखाना वारंवार बंद पडत होता. त्यामुळे बाहेरून टोळ्या आणण्याचे काम चालू आहे. सोलापूरवरून टोळ्या आणण्यात येत आहेत. एप्रिलपर्यंत ऊसाचे गाळप करण्यात येणार आहे. साखर कारखान्याने साथ दिल्यास यंदा बऱ्यापैकी ऊसाचे गाळप होईल.
- नामदेवराव ढोकणे, अध्यक्ष, तनपुरे सहकारी साखर कारखाना