आढळा धरण ओव्हरफ्लो

By Admin | Published: September 6, 2014 11:50 PM2014-09-06T23:50:41+5:302023-06-27T11:55:37+5:30

अकोले : आढळा या अवर्षणप्रवण भागासाठी आठमाही बागायतीला वरदान ठरलेले १ हजार ६० दलघफू क्षमतेचे आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरले

Overflow dam overflow | आढळा धरण ओव्हरफ्लो

आढळा धरण ओव्हरफ्लो

अकोले : आढळा या अवर्षणप्रवण भागासाठी आठमाही बागायतीला वरदान ठरलेले १ हजार ६० दलघफू क्षमतेचे आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरले व सांडव्यातून ५०० क्युसेक वेगाने ओव्हरफ्लोचे पाणी नदीपात्रात झेपावले.
१९७९ ला धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. तब्बल २४ वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, १२ वेळा धरण रिते राहिले नाहे. २ हजार ४४ मीटर लांबीचे व १३९ मीटर उंचीचे हे मातीचे धरण असून, मघा आणि पूर्वा नक्षत्रात १५ दिवस पाऊस कोसळल्याने धरण भरून ओसंडून वाहू लागले आहे.
तीन तालुक्यांच्या १६ गावांना या धरणाच्या पाण्याचा लाभ होतो. दरम्यान देवठाण गावकऱ्यांनी व आढळा खोऱ्याच्या वतीने शनिवारी जलपूजन झाले. मधुकर तळपाडे, राम सहाणे, परशुराम काकड, दगू दराडे आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Overflow dam overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.