बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणेकडून बूथ हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:02+5:302021-05-30T04:19:02+5:30

यावेळी देसाई म्हणाले की, कोरोना काळात सर्वसामान्य रुग्णांना आधार देऊन कोरोनामुक्त करण्याचे काम बूथ हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे. आपण ...

Oxygen Concentrator Visits Booth Hospital from Bank of India Staff Union Pune | बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणेकडून बूथ हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणेकडून बूथ हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

यावेळी देसाई म्हणाले की, कोरोना काळात सर्वसामान्य रुग्णांना आधार देऊन कोरोनामुक्त करण्याचे काम बूथ हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे. आपण आजारातून मुक्त होऊ हा विश्वास रुग्णांमध्ये निर्माण करण्यात बूथ हॉस्पिटलचे निस्वार्थ सेवाभावी कार्य यशस्वी होत आहे. विशेष म्हणजे या दवाखान्यात कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार केले जातात. कळकुंबे म्हणाले की, कोरोना संकट काळात कार्य करीत असताना बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे सहकार्य आणि मदत रुग्णसेवा करायला नवी ऊर्जा देते.

बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनच्या माध्यमातून रुग्णसेवेसाठी १३ जिल्ह्यांतील हॉस्पिटलला साडेसहा लाख रुपये किमतीचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात येणार आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली.

मागील वर्षीसुध्दा स्थलांतरित मजुरांच्या भोजनाची व्यवस्था संघटनेच्या कार्यक्षेत्रामधील १३ जिल्ह्यांमध्ये करण्यात आली होती. महानगरपालिका कोरोना दक्षता प्रमुख शशिकांत नजान यांनी बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याबद्दल विशेष अभिनंदन केले आणि बूथ हॉस्पिटलच्या सेवाकार्याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी आशुतोष फळे, अमोल बर्वे, सुशील जगदाळे, मंगल क्षीरसागर, आशा राशिनकर, सुनील गोंदके, दिनेश दावभट, राहुल ननावरे तसेच महानगरपालिका कोरोना दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान, सहाय्यक सूर्यभान देवघडे, नंदकुमार नेमाणे, राजेंद्र बोरुडे, अमोल लहारे आदी उपस्थित होते.

-----------

फोटो - २९ बँक ऑफ इंडिया भेट

बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनच्या (पुणे) वतीने बूथ हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले.

Web Title: Oxygen Concentrator Visits Booth Hospital from Bank of India Staff Union Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.