कोविड सेंटरला बायफकडून ऑक्सिजन सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:19 AM2021-05-23T04:19:35+5:302021-05-23T04:19:35+5:30
अकोले : तालुक्यात गेल्या पन्नास वर्षांपासून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बायफ या सेवाभावी संस्थेकडून कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर व ...
अकोले : तालुक्यात गेल्या पन्नास वर्षांपासून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बायफ या सेवाभावी संस्थेकडून कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर व औषधांची मदत करण्यात आली आहे.
ग्रामीण आदिवासी भागाच्या विकासात बायफचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यातूनच संस्थेचे हजारो गरीब कुटुंबांशी संबंध आले. कोरोनाच्या काळातही गरीब आणि निराधार लोकांचे अश्रू पुसून त्यांना आधार देण्यासाठी बायफने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सामाजिक भावनेतून कोविड सेंटरला मदतीचा हात देताना त्यांच्या अडचणी समजून घेत ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात आलेला आहे. बायफ संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी उभ्या केलेल्या आपत्कालीन निधीतून ही मदत देण्यात आली.
समशेरपूर व कळस येथील कोविड केअर सेंटरला प्रत्येकी ५ ऑक्सिजन सिलिंडर प्रदान करण्यात आले. सव्वा दोन लाख रुपये किमतीचे ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन फ्लोमीटर या दोन सेंटरला देण्यात आली आहेत. संस्थेचे माजी अध्यक्ष गिरीश सोहनी व विभागीय संचालक व्ही. बी. द्यासा यांच्या मार्गदर्शनाने यापुढेही रुंग्णांना सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय संसाधनांसोबत औषधे, वैद्यकीय उपकरणे, जाणीव-जागृतीची साधने देण्यात येणार असल्याची माहिती राज्य समन्वयक सुधीर वागळे, जितीन साठे, डॉ. वैभव दातरंगे यांनी दिली.