पोलीस गस्तीच्या वाहनात ऑक्सिजन सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:51+5:302021-05-25T04:23:51+5:30

पोलीस अधीक्षक कार्यालयात लंगर सेवेच्या सेवादारांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे ऑक्सिजनचे कॅन ...

Oxygen facility in a police patrol vehicle | पोलीस गस्तीच्या वाहनात ऑक्सिजन सुविधा

पोलीस गस्तीच्या वाहनात ऑक्सिजन सुविधा

पोलीस अधीक्षक कार्यालयात लंगर सेवेच्या सेवादारांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे ऑक्सिजनचे कॅन सुपुर्द केले. यावेळी लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंग धुप्पड, राहुल बजाज, किशोर मुनोत, जय रंगलानी, मनोज मदान, सतीश गंभीर, राजा नारंग, करण धुप्पड, राहुल शर्मा, नारायण अरोरा, अर्जुन मदान, सुनील थोरात, सूरज तोरणे, पुरुषोत्तम बेट्टी, शरद बेरड, प्रमोद पंतम, राजबीरसिंग संधू, संदेश रपारीया, प्रशांत मुनोत, सिमर वधवा, कैलाश नवलानी, राजवंश धुप्पड, मन्नू कुकरेजा, टोनी कुकरेजा, गोविंद खुराणा आदी उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून जनसेवा घडत आहे. कोरोनाच्या संकटकाळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लंगर सेवेच्या सेवादारांनी मदत पोहोचवली आहे. त्यांचे कार्य अतुलनीय असून, या ऑक्सिजनच्या सेवेद्वारे अनेक गरजूंना जीवदान मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हरजितसिंह वधवा यांनी ऑक्सिजन पातळी घटलेल्या रुग्णांना ऑक्सिजन कॅनचा मोठा आधार मिळत आहे. ऑक्सिजन कॅनला मागणी असून, गस्त घालणारे पोलिसांचे वाहन अनेक गरजू रुग्णांपर्यंत ही सेवा घेऊन जाणार आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कार्यान्वित केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

----------------------

४० वाहनांमध्ये प्रत्येकी ५ ऑक्सिजन कॅन

जिल्ह्यात गस्त घालणार्‍या पोलिसांच्या ४० वाहनांमध्ये प्रत्येकी ५ ऑक्सिजन कॅनप्रमाणे दोनशे ऑक्सिजन कॅन पोलीस प्रशासनास देण्यात आले आहेत. पोलिसांना अनेक गरजू रुग्ण मिळत असतात, ज्यांना ऑक्सिजनची गरज असते. अशा रुग्णांना लंगर सेवेचे ऑक्सिजन पुरविण्याचे काम पोलीस प्रशासन करणार आहे. पोलीस प्रशासनाचे गस्तीचे चारचाकी वाहन ऑक्सिजनयुक्त राहणार आहे.

-------------------------------

ओळी- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यासाठी घर घर लंगर सेवेच्यावतीने पोलीस दलास दोनशे ऑक्सिजन कॅन पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

फोटो सजिदने मेलवर टाकले आहेत.

Web Title: Oxygen facility in a police patrol vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.