शेवगावात उभारणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:49+5:302021-05-08T04:21:49+5:30

शेवगाव : ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ...

Oxygen production project to be set up at Shevgaon | शेवगावात उभारणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

शेवगावात उभारणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

शेवगाव : ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. येत्या १५ जूनअखेर शेवगावात ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करण्यात येऊन तो कार्यान्वित केला जाणार असल्याचे प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी सांगितले.

गुरुवारी चाकण (पुणे) येथील ब्राईज केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या पथकाने शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे येऊन जागेची पाहणी केली आहे. यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार अर्चना पागिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे आदी उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयांच्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ऑक्‍सिजन निर्मितीचा प्रकल्प तयार केला जाणार आहे. या दहा ठिकाणी दररोज १०० ऑक्‍सिजन सिलिंडर तयार होतील, एवढी क्षमता असणार आहे.

Web Title: Oxygen production project to be set up at Shevgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.