लोहारे येथील ऑक्सिजन प्लांटमधून ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:21 AM2021-05-06T04:21:28+5:302021-05-06T04:21:28+5:30

कोपरगाव : संगमनेर तालुक्यातील लोहारे येथे औद्योगिक क्षेत्राला पुरवठा करणारा ऑक्सिजन प्लांट बंद होता. या प्लांटला मेडिकल ऑक्सिजन निर्मिती ...

Oxygen production started from Oxygen Plant at Lohare | लोहारे येथील ऑक्सिजन प्लांटमधून ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात

लोहारे येथील ऑक्सिजन प्लांटमधून ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात

कोपरगाव : संगमनेर तालुक्यातील लोहारे येथे औद्योगिक क्षेत्राला पुरवठा करणारा ऑक्सिजन प्लांट बंद होता. या प्लांटला मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे पाठपुरावा करून सदर प्लांटला मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी तत्काळ परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार सदरचा प्लांट कार्यान्वित झाल्यामुळे कोपरगाव व राहाता तालुक्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.

कोल्हे म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना विशेषत: ऑक्सिजन बेड मिळत नव्हते. त्यामुळे रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची प्रचंड हेळसांड झाली होती. लोहारे येथील प्लांटला समक्ष भेट देऊन प्लांटचे संचालक पोकळे यांच्याशी मेडिकल ऑक्सिजन निर्मिती सुरू करण्यासाठी काय अडचणी आहेत, याची माहिती घेऊन माजी आमदार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनस्तरावर असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यावर या प्लांटमधून प्रत्यक्षात ऑक्सिजन निर्मिती सुरू झालेली आहे.

...............

मंत्री थोरात व आमदार विखे यांचे आभार...

या प्लांटसाठी सर्व मान्यता मिळाल्या; मात्र लिक्विड ऑक्सिजनची गरज असल्यामुळे लिक्विड ऑक्सिजन मिळावा, यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही प्रयत्न केल्यामुळे गोरगरिबांचे प्राण आता ऑक्सिजन नसल्यामुळे जाणार नाही, याची तातडीने खबरदारी घेतली, त्याबद्दल या दोघांचेही विवेक कोल्हे यांनी आभार मानले आहे.

Web Title: Oxygen production started from Oxygen Plant at Lohare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.