मिरी येथे ऑक्सिजन सेवायुक्त कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:18 AM2021-04-26T04:18:56+5:302021-04-26T04:18:56+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे ५० बेडचे ऑक्सिजन सेवायुक्त दत्तप्रसाद कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन माजी आमदार शिवाजी कर्डिले ...
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे ५० बेडचे ऑक्सिजन सेवायुक्त दत्तप्रसाद कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. मिरी येथील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांसह काही राजकीय नेतेमंडळींनी एकत्रित येत दत्तप्रसाद कोविड हेल्थ सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळाला आहे. डॉ. बबनराव नरसाळे, अविनाश नरवडे, नंदकिशोर नरसाळे, जयश्री नरवडे, आरती नरसाळे, डॉ. जयस्वाल, माजी सरपंच संतोष शिंदे, पं.स. सदस्य एकनाथ आटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, ज्येष्ठ नेते संजय नवल, माजी अध्यक्ष पोपटराव गवळी, शिवसेना नेते एकनाथ झाडे, माजी सरपंच जगदीश सोलाट, राजू इनामदार, डॉ. हरिभाऊ गाडे, डॉ. गायसमुद्रे, युवानेते सोमनाथ झाडे, डॉ. दत्ता देशमुख, आदिनाथ दारकुंडे, बापूराव वेताळ, तानाजी गवळी, अशोक झाडे, विजय कुटे, रवी पाटोळे, महेश मिरपगार, दामोदर मिरपगार, सोपान वेताळ आदी उपस्थित होते.