लसीकरणाची कासवगती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:21 AM2021-05-11T04:21:29+5:302021-05-11T04:21:29+5:30

(डमी) अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू होऊन चार महिने उलटले आहेत, मात्र अद्यापही लसीकरणाचा खेळखंडोबा सुरूच आहे. लसीकरण ...

The pace of vaccination! | लसीकरणाची कासवगती!

लसीकरणाची कासवगती!

(डमी)

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू होऊन चार महिने उलटले आहेत, मात्र अद्यापही लसीकरणाचा खेळखंडोबा सुरूच आहे. लसीकरण कासवगतीने सुरू आहे, मात्र त्यातही रोज गोंधळ उडतो. नगर जिल्ह्याला सरासरी रोज २० ते २५ हजार डोसची गरज असताना सध्या केवळ दोन ते तीन हजार डोस मिळतात.

नगर जिल्ह्यासह देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. प्रारंभी लसीकरणाचा वेग कमी होता. कारण लोकांचा प्रतिसाद नव्हता. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर लसीकरणाला गर्दी लोटली. शासनाने नंतर टप्प्याटप्प्याने ४५ व रस्त्यांवरील सर्वांना लढा देण्याचे ठरवले. आता १ मे पासून अठरा वर्षांपुढील सर्वांनाच लस मिळणार असल्याचे शासनाने जाहीर केले. मात्र लस मिळण्यामध्ये सर्वांनाच अनंत अडचणी आहेत.

नगर जिल्ह्याला सध्या आठवडाभरात केवळ २० ते २५ हजार डोस प्राप्त होतात. मुळात नगर जिल्ह्यासाठी आठवडाभरात एक ते सव्वा लाख डोस मिळायला हवेत.

सध्या नगर जिल्ह्यात १६५ लसीकरण केंद्र आहेत, मात्र सरासरी १०० केंद्रांवर लसीकरण चालते. एका केंद्रावर दररोज दोनशे याप्रमाणे साधारण वीस हजार दिवसाला गरजेचे आहेत. मात्र सध्या लसीकरणात मोठा विस्कळीतपणा आहे. लस असेल तर कधी दिवसाला १५ हजार आणि लस कमी असेल तर दिवसभरात हजारही डोस होत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या प्रचंड रांगा रोज केंद्रांवर लागत आहेत. केंद्रांवर गर्दी वाढल्याने कोरोनाचा धोकाही वाढत आहे, मात्र शासनाला यावर अद्यापही उपाययोजना करता आलेली नाही.

------------

आतापर्यंतचे लसीकरण

पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी २५९९४ १६८३४

फ्रंटलाईन वर्कस ९९००. ५५००

ज्येष्ठ नागरिक

४५ च्या पुढील वयोगट ४०३००५. ७३९२६

१८ ते ४५ वयोगट

१७१५६

------------

लस असेल तरच केंद्र सुरू

नगर जिल्ह्यात सध्या १०० हून अधिक केंद्रांवरील लसीकरण सुरू आहे. मात्र लस नसल्यामुळे यातील बहुतांश केंद्र बंद असतात. जेव्हा लस येईल तेव्हा केंद्र सुरू होतात. त्यावरही मोठी गर्दी जमते.

--------------

वयोगटानुसार केंद्र

१८ वर्षांवरील नागरिकांना नगर शहरात पाच, तसेच तालुकानिहाय एक असे १९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना इतर केंद्रांवर लस दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी बंधनकारक नसल्याने केंद्रांवर मोठी गर्दी जमते.

--------------

लसीकरण दहापासून लाईन सकाळी सहापासूनच

लसीकरणाची वेळ सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होते. मात्र ज्येष्ठ नागरिक सकाळी सहा वाजल्यापासूनच केंद्र रांगा लावतात. अनेकदा त्यांच्यामध्ये भांडणे तर आरोग्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रकार होतात.

---------------

मी गेल्या तीन दिवसांपासून लस घेण्यासाठी नगर शहरातील केंद्रावर येत आहे, मात्र लस संपली म्हणून सांगितले जाते. ज्येष्ठ नागरिकांनाही नोंदणी करूनच शिस्तीने लस देण्याची गरज आहे.

- नारायण वायकर, ज्येष्ठ नागरिक

-------------

अठरा वर्षांपुढील लसीकरणासाठी ॲपवर नोंदणी गरजेची आहे. नोंदणी होते, मात्र लसीकरणाची वेळ मिळत नाही. त्यावर कायमच बुकिंग झालेले आढळते. त्यामुळे अद्याप लसीकरणाचा लाभ मिळालेला नाही.

- रवी शिंदे, तरुण

---------

(लसीकरणासाठी रांग लागलेला फोटो असेल तर वापरावा.)

Web Title: The pace of vaccination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.