पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:23 AM2021-08-23T04:23:17+5:302021-08-23T04:23:17+5:30
प्रवरा परिवाराच्या वतीने प्रवरानगर येथे पद्मश्रींच्या स्मृतीस्थळावर अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. आमदार राधाकृष्ण विखे, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, प्रवरा ...
प्रवरा परिवाराच्या वतीने प्रवरानगर येथे पद्मश्रींच्या स्मृतीस्थळावर अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. आमदार राधाकृष्ण विखे, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजेंद्र विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, खासदार डॉ. सुजय विखे, कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास कडू, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, बाळासाहेब जपे यांच्यासह सर्व संचालक आणि प्रवरा परिवारातील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
लोणी बुद्रूक(ता.राहाता) ग्रामपंचायतीच्या वतीने संपन्न झालेल्या अभिवादन कार्यक्रमास पद्मश्रींच्या पुतळ्यास आमदार राधाकृष्ण विखे यांनी पुष्पहार अर्पण केला. विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष सी.एम. विखे, ट्रक्स वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदू राठी, सिनेट सदस्य अनिल विखे, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, रामभाऊ विखे, दिलीपराव विखे, चेअरमन चांगदेव विखे, प्राचार्य डॉ.पी.एम. दिघे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे उपस्थित होते. तर लोणी खुर्द सेवा संस्थेत पद्मश्री विखे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष वसंतराव आहेर, संचालक श्रीकिसन आहेर उपस्थित होते.
शासनाच्या वतीने पुणे येथील पुणे येथील साखर संकुलाच्या आवारात पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी फलोत्पादन संचालक कैलास मोते, आत्माचे संचालक सुभाष नागरे, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे प्रकल्प आधिकारी विनय आवटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विनय आवटे यांनी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे जीवन आणि कृषी औद्योगिक क्षेत्रातील योगदान यावर मार्गदर्शन झाले. जयंतीनिमित्त ऑनलाइन पध्दतीने भात पिकावरील कीड व आरोग्य आणि त्याचे व्यवस्थापन या विषयी डॉ.जी.आर श्याम कुवर यांचे मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी, आत्माचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. राहाता तालुक्यात पद्मश्री विखे पाटील जयंतीनिमित्ताने राहाता कृषी कार्यालय व बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र, आयोजित कपाशीवरील लाल्यारोगाचे नियंत्रण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयी शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यावेळी उपस्थित होते. पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यात विविध ठिकाणी शेतकरी दिन साजरा करण्यात आला.