प्रहार संघटना सर्व जागा लढविणार : आमदार बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 04:52 PM2018-09-30T16:52:30+5:302018-09-30T16:52:34+5:30
महापालिकेत एक चहा दोनशे रुपयांना मिळतो. मंत्र्यांच्या हार-तुऱ्यासाठी एकाच दिवशी ९५ हजार रुपयांचा खर्च केला जातो.
अहमदनगर : महापालिकेत एक चहा दोनशे रुपयांना मिळतो. मंत्र्यांच्या हार-तुऱ्यासाठी एकाच दिवशी ९५ हजार रुपयांचा खर्च केला जातो. एका झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी ९५ हजार रुपयांचे बिल काढण्यात आले. घोटाळ््याची रक्कम ५० कोटीपर्यंत असल्याचा आरोप आ. बच्चू कडू आणि अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रहार संघटना महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एका कार्यक्रमासाठी नगरमध्ये आलेल्या आ. कडू यांनी नगर महापालिकेतील भ्रष्टाचारावर घणाघात केला. अजय बारस्कर यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली. ती पत्रकारांना सविस्तरपणे सांगितली. त्यानंतर महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आ. कडू म्हणाले, नगर महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. एका चहाच्या बिलांमध्ये गरिबांची घरे बांधून झाली असती. या चहासाठी मुख्यमंत्र्यांकडून दूध आणि मोदी यांच्याकडून चहा आणला असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा चहा महाग झाला असावा. याबाबत अधिवेशनात आवाज उठविणार आहे. अशा घोटाळ््यांमुळेच महापालिकेवर लोकांचा विश्वास राहिला नाही. प्रहार संघटना महापालिकेच्या सर्व जागा लढविणार आहे. चोरांनी लढविण्यापेक्षा आम्ही ही निवडणूक लढवू.
आयटी विभागात महाघोटाळे
दुष्काळाचे सावट असताना महावितरण कंपनी शेतकºयांची अडवणूक करीत आहे. शेतकºयांना डीपी बसवून दिली नाही तर उर्जामंत्री चंद्रशेखर बावकुळे यांचा प्रतिकात्मक पुतळा मंत्रालयावर उलटा टांगण्याचा इशाराही आ. कडू यांनी दिला. आयटीआयच्या परीक्षेत गरीब विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. आम्ही बोललो तर लगेच कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल होतो. अधिकारी कायदे पाळत नाहीत, त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल होत नाही. आम्ही महात्मा गांधी यांच्या मार्गानेच जातो. मात्र अधिकारी कायदा तुडविणार असतील तर भगतसिंग यांच्या मार्गानेच जावे लागेल. रस्त्यांमध्ये जेवढा घोटळा होतो, त्यापेक्षा कितीतरी मोठे घोटाळे सरकारच्या आयटी विभागात होतात, असाही आरोप आ. कडू यांनी केला. असे घोटाळे असतील तर गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते.
घोटाळ््याचे नमुने
दीडशे जणांच्या चहाचे १५ हजार रुपये बिल
स्वातंत्र्यदिनी मंत्र्यांच्या सत्कारासाठी
९५ हजार रुपयांचे बुके
झेरॉक्ससाठी लाखो रुपयांचे बिले
प्रकल्प अहवालाच्या नावाखाली
लाखो रुपये अदा
एका झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी
९० हजार रुपये
एका बाकड्याची किंमत ३२ हजार रुपये
एकाच ठेकेदाराकडे अनेक कामे