मुख्यमंत्र्यांना पाठविली पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर अन भेसळयुक्त दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:20 PM2018-06-05T12:20:16+5:302018-06-05T12:22:54+5:30

दुधाला हमीभाव मिळण्यासाठी चालू असलेल्या शेतकरी आंदोलकांच्या वतीने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेध आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर, तर गुजरात, आंध्र व कर्नाटकचे भेसळयुक्त दूध जिल्हाधिका-यांमार्फत पाठविल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी यावेळी सांगितले.

Pakistan's sugar, Mozambique's fur and adulterated milk, sent to the Chief Minister | मुख्यमंत्र्यांना पाठविली पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर अन भेसळयुक्त दूध

मुख्यमंत्र्यांना पाठविली पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर अन भेसळयुक्त दूध

अहमदनगर : दुधाला हमीभाव मिळण्यासाठी चालू असलेल्या शेतकरी आंदोलकांच्या वतीने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेध आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर, तर गुजरात, आंध्र व कर्नाटकचे भेसळयुक्त दूध जिल्हाधिका-यांमार्फत पाठविल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात तीन लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मराठवाडा व विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत मिळत असल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. त्यात जोडधंदा असलेल्या दुधाला योग्य भाव मिळत नाही. शेतक-यांची अशी बिकट स्थिती असताना सरकार पाकिस्तानकडून साखर आयात करत आहे. मोझांबिक देशातून तूर घेत आहे. तर शेतक-यांच्या दुधाला कमी भाव मिळत असून, एका लीटरचे तीन लीटर भेसळयुक्त दूध बनविण्याचे पाप डेअरी व दूधसंघ करीत आहेत. यावेळी अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Pakistan's sugar, Mozambique's fur and adulterated milk, sent to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.