पंकज लोंढे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:12+5:302021-02-14T04:19:12+5:30
शुक्रवारी (दि. १२) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरातील निवासस्थानी अॅड.लोंढे व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. काँग्रेस नेते सुरेश ...
शुक्रवारी (दि. १२) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरातील निवासस्थानी अॅड.लोंढे व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. काँग्रेस नेते सुरेश थोरात उपस्थित होते. माजी उपसरपंच किरण गायकवाड, माजी उपसरपंच दादासाहेब गवांदे, महेश त्रिभुवन, सतीश आग्रे, प्रवीण घोडेकर, दिलीप नळे, समद शेख, गणेश चोळके यांसह अस्तगावच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना ॲड.लोंढे म्हणाले, भाजपचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे. पक्षाची मूळ विचारधारा बाजूला होऊन काही शक्ती तालुका, जिल्हा ताब्यात घेऊ पाहत आहे. हे लोकशाहीला घातक आहे. भाजपची नीती चुकीची आहे. याउलट काँग्रेस जनसामान्यांसाठी काम करणारा पक्ष आहे.
महसूलमंत्री थोरात यांचे स्वच्छ नेतृत्व हे भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांसाठी आकर्षण ठरले आहे. जनसामान्यांच्या विकासाचे काम करायचे आहे. समाजासाठी काम करताना आपल्या भागाचा विकास करायचा असून, त्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवरा परिसरातील अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. सचिन चौगुले, नितीन सदाफळ, सचिन गाडेकर आदी यावेळी उपस्थित होते.