वारीतील पायीज्योत मंडळानी दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 02:18 PM2018-10-11T14:18:25+5:302018-10-11T14:18:34+5:30

तालुक्यातील पूर्व भागातील वारी येथील पायी ज्योत आणणा-या मंडळांनी यंदा गावात गेल्या महिनाभरात लागोपाट अनेक दु:खद घटना घडल्याने दुखित कुटुंबाचे दु:ख ते आपले दुख: मनात अत्यंत साध्या पद्धतीने पायी ज्योत आणून येथील जगदंबा माता मंदिरात समारोप करत एकप्रकारचा सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे .

Parijot Mandala gave a message of social commitment | वारीतील पायीज्योत मंडळानी दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश

वारीतील पायीज्योत मंडळानी दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश

कोपरगाव : तालुक्यातील पूर्व भागातील वारी येथील पायी ज्योत आणणा-या मंडळांनी यंदा गावात गेल्या महिनाभरात लागोपाट अनेक दु:खद घटना घडल्याने दुखित कुटुंबाचे दु:ख ते आपले दुख: मनात अत्यंत साध्या पद्धतीने पायी ज्योत आणून येथील जगदंबा माता मंदिरात समारोप करत एकप्रकारचा सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे .
 तालुक्यातील वारीतील ज्योत घेऊन येणारी मंडळ गेल्या अनेक वर्षापासून नवरात्रोत्सवात राज्यातून तसेच परराज्यातून तेथील जागृत देवस्थान असलेल्या देवी मंदिरपासून हातातील ज्योत पेटवून हातात पेटती ज्योत घेऊन पायी धाऊन आणता आहे. त्यामध्ये या परंपरेची येथील मृत्युंजय तरुण मंडळाने १९ वषार्पूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या मंदिरातून पेटती ज्योत हातात घेऊन पायी धावत सुरवात केली आहे. दुसरे सप्तशृंगी तरुण मंडळा देखील १७ वषार्पासून, जय तुळजाभवानी तरुण मंडळ १४ वर्षे, साईदीप मित्र मंडळ ४ वर्ष आहे. मागील महिभरापासून वारीत सतत दुखद घटना घडत आहे. यामध्ये अत्यंत कमी वयातील महीला-पुरुष यांचे निधन झाले आहे. त्यातच सोमवारी तर २४ तासात वारीतील तब्बल ४ व्यक्तीचे निधन झाले. त्यामुळे वरील सर्व मंडळांनी यंदा कुठलाही गाजावाजा, मिरवणूक न काढता अत्यंत शांतेच्या मागार्ने पायी ज्योत हा धार्मिक उपक्रम पार पाडला आणि त्यातून गावातील मयत झालेल्या व्यक्तींना एकप्रकारची श्रद्धांजली वाहत सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसत आहे.
 यंदा मृत्युंजय तरुण मंडळाने अकोले पिंपळदरी येथील येडूआई माता येथून, सप्तशृंगी तरुण मंडळाने नगर तालुक्यातील मळगंगा देवस्थान येथून, तुळजा भवानी तरुण मंडळाने राहता तालुक्यातील कोल्हार येथील भगवती माता मंदिर येथून तर साई दीप मित्र मंडळाने कोपरगाव येथील जुनीगंगा देवीमंदिरातून पायी ज्योत आणल्या.

Web Title: Parijot Mandala gave a message of social commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.