पारनेर परिसरात पावसाने डोंगरावरून वाहू लागले झरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:52 AM2020-06-13T11:52:14+5:302020-06-13T11:53:01+5:30

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील पोखारी,कामटवाढी,मांडवे खु.,पळसपूर, बोकनकवाडी  परिसरात पावसाची दमदार हजेरी लावल्या मुळे बळीराजा  सुखावला  असून परिसरात पेरणीला वेग आला  आहे.  

In the Parner area, rains caused streams to flow from the mountains | पारनेर परिसरात पावसाने डोंगरावरून वाहू लागले झरे

पारनेर परिसरात पावसाने डोंगरावरून वाहू लागले झरे

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील पोखारी,कामटवाढी,मांडवे खु.,पळसपूर, बोकनकवाडी  परिसरात पावसाची दमदार हजेरी लावल्या मुळे बळीराजा  सुखावला  असून परिसरात पेरणीला वेग आला  आहे.  
सध्या मृग नक्षत्र असून गेल्या दोन दिवसापासून पावसाचे वातावरण तयार होते. गुरुवारी सकाळपासून वातारणात प्रचंड ऊन व उकाडा होत असल्याने पावसाची शक्यता तयार होते. दुपारी  चारच्या सुमारास या परिसरात पावसाला दमदार सुरवात झाल्यामुळे ओढे, नाले पाण्याने वाहू लागले असून परिसरातील जमिनी उपाळल्यामुळे  पाऊस चांगला होऊन सुद्धा पेरण्या लाभू शकतात. चांगल्या पावसामुळे विहिरी, कूपनलिकांमधील  पाण्याच्या  पातळीत  वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 
परिसरातील या पावसाने ओढ्यांमध्ये पाणी आल्यामुळे छोटो मोठे केटीवेयर भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकºयांनी  वटाणा, मूग पेरणीला सुरवात केली आहे. सलग दोन दिवस  चांगला पाऊस बरसल्याने शेतक-यांची बी बियाणे व खत घेण्यास लगबग चालू झाली आहे. 
----
कामटवाडी परिसरात  दमदार पाऊस पडल्याने  डोंगरावरून  वाहणारे पाणी 
 

Web Title: In the Parner area, rains caused streams to flow from the mountains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.