महाराष्ट्र : पारनेर विधानसभा निवडणूक निकाल - निलेश लंके विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:19 PM2019-10-24T13:19:49+5:302019-10-24T13:20:29+5:30

Ahmednagar Election Result 2019 : पारनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना पराभवाचा धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी बाजी मारली आहे़. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे़ लंके यांची जेसीबीवरुन मिरवणूक काढण्यात आली आहे़.

Parner Assembly Election Results: Nilesh Lanka won | महाराष्ट्र : पारनेर विधानसभा निवडणूक निकाल - निलेश लंके विजयी

महाराष्ट्र : पारनेर विधानसभा निवडणूक निकाल - निलेश लंके विजयी

पारनेर : पारनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना पराभवाचा धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी बाजी मारली आहे़. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे़ लंके यांची जेसीबीवरुन मिरवणूक काढण्यात आली आहे़.
पारनेर विधानसभा निवडणुकीत २ लाख ५ हजार मतदान झाले होते़ त्यापैकी सुमारे १ लाख ८० हजार मतमोजणी झाली असून, त्यापैकी १ लाख ९ हजार मते लंके यांना मिळाली आहेत़. पारनेर मतदारसंघात लंके यांना मिळालेली ही मते आत्तापर्यंतची सर्वाधिक मते असल्याचे सांगण्यात येते़  औटी यांना ६४ हजार मते मिळाली आहेत़. अद्याप सुमारे २५ हजार मतमोजणी बाकी आहे़. मात्र, लंके यांची निर्णायक आघाडी पाहता त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे़. 
विजयाच्या जवळ येताच लंके यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची जेसीबीवरुन मिरवणूक काढली़. कार्यकर्त्यांनी लंके यांच्या नावाच्या जोरदार घोषणा देत गुलालाची उधळण केली़ औटी हे सलग तीन वेळा पारनेरमधून निवडून आले़. निवडणूक निकालाच्या कल पाहता औटी यांची विजयी घोडदौड रोखण्यात लंके यांना यश आल्याचे दिसते़.

Web Title: Parner Assembly Election Results: Nilesh Lanka won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.