पारनेरच्या मुलींनी फक्त वीस रुपयात बनवली मोबाईल पॉवर बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:56 PM2017-12-19T15:56:44+5:302017-12-19T15:58:24+5:30

मोबाईल कुठेही चार्ज करायचे म्हटल्यावर महागडी पॉवर बँक घ्यावी लागते. परंतु आता पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी धनश्री शिंदे व यास्मीन शेख यांनी अवघ्या वीस रुपये खर्चातून मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक बनवली आहे.

Parner's girls made power bank for mobile in only 20 rupees | पारनेरच्या मुलींनी फक्त वीस रुपयात बनवली मोबाईल पॉवर बँक

पारनेरच्या मुलींनी फक्त वीस रुपयात बनवली मोबाईल पॉवर बँक

ठळक मुद्देपारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी धनश्री शिंदे व यास्मीन शेख यांनी अवघ्या वीस रुपये खर्चातून मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक बनवली आहे.चार्जिंग सेलला वायर बसवून त्याचा करंट डिआरडीला देण्यात आला आहे. यास कॅपॅसिटर जोडले आहे. शिवाय चार्जरच्या पिनाही बसवण्यात आल्या आहेत.मोबाईल चार्ज होत आहे हे लक्षात यावे म्हणून एक छोटा बल्बही आतमध्ये बसवण्यात आला आहे. एका छोट्या प्लॅस्टीकच्या डब्यात हा सेट करण्यात आला आहे. सुमारे एक ते दोन तासाचा बॅकअप यात राहतो.

विनोद गोळे
पारनेर : मोबाईल कुठेही चार्ज करायचे म्हटल्यावर महागडी पॉवर बँक घ्यावी लागते. परंतु आता पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी धनश्री शिंदे व यास्मीन शेख यांनी अवघ्या वीस रुपये खर्चातून मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक बनवली आहे.
पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेज, पारनेरमध्ये अकरावी शास्त्रमध्ये धनश्री शिंदे (राळेगण थेरपाळ), यास्मीन शेख (कामरगाव) या मुली शिक्षण घेत आहेत. त्या दोघींना सहलीला जाण्यासाठी मोाबाईल चार्जरची आवश्यकता होती. त्यांनी बाजारात विचारपूस केल्यावर त्यांना खूप महागडी पॉवर बँक असल्याचे लक्षात आले. मग आपणच पॉवर बँक बनवू असे दोघींनी ठरवले. त्यासाठी बाजारात मिळणारे चार्जिंग होणारे सेल वीस रूपयांत आणले़ वाहनात असणारे चार्जरमधील डिआरडी काढला. या डिआरडीमध्ये नऊ व्होल्ट असतो. मोबाईल चार्जिंगसाठी फक्त पाच व्होल्टची गरज असते. हा डिआरडी वीज साठवून ठेवतो. त्यानंतर मोटारचे कॅपॅसिटर लावण्यात आले आहे. आणखी मार्गदर्शन विद्यार्थिनींनी प्राचार्य मुकुंद जासूद, शास्त्र विभागाचे समन्वयक बाळासाहेब करंजुले, प्रा. दळवी यांच्याकडून घेऊन मोबाईल चार्ज करणारी पावर बँक बनवली आहे. पारनेर येथे झालेल्या तालुका गणित-विज्ञान प्रदर्शनातही या दोघींनी हे उपकरण मांडले होते. त्यावेळी ते लक्षवेधी ठरले होते.

अशी बनवली पॉवर बँक

चार्जिंग सेलला वायर बसवून त्याचा करंट डिआरडीला देण्यात आला आहे. यास कॅपॅसिटर जोडले आहे. शिवाय चार्जरच्या पिनाही बसवण्यात आल्या आहेत. मोबाईल चार्ज होत आहे हे लक्षात यावे म्हणून एक छोटा बल्बही आतमध्ये बसवण्यात आला आहे. एका छोट्या प्लॅस्टीकच्या डब्यात हा सेट करण्यात आला आहे. सुमारे एक ते दोन तासाचा बॅकअप यात राहतो, असे धनश्री शिंदे व यास्मीन शेख यांनी सांगितले. शिवाय पॉवर बँकेत पुन्हा चार्ज करण्याचीही सुविधा बनवण्यात आली आहे.

Web Title: Parner's girls made power bank for mobile in only 20 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.