पारनेरच्या युवकांचे कोविड सेंटरमध्ये अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:04+5:302021-05-13T04:22:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पारनेर : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोविड सेंटरमध्ये असणाऱ्या बाधितांना अन्नदान करून स्वतःचा वाढदिवस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पारनेर : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोविड सेंटरमध्ये असणाऱ्या बाधितांना अन्नदान करून स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय पारनेर येथील बुगेवाडी येथील युवकांनी घेतला आहे.
पारनेरजवळील बुगेवाडी येथे सध्या कोरोनाबाधित रुग्ण काही प्रमाणात आहेत. त्यातील अनेक रुग्ण आमदार नीलेश लंके यांनी भाळवणीत उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये विलगीकरणामध्ये आहेत. यावेळी बुगेवाडी येथील युवक दादाभाऊ कावरे यांनी स्वत: दररोज आठ दिवस अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या वाढदिवसापासून सुरुवात करून आठ दिवस दररोज कोविड सेंटरमध्ये अन्नदान केले आहे. आता या महिन्यात ज्या युवकांचा वाढदिवस असेल त्यातील युवक अशा पद्धतीने उपक्रम राबवणार आहेत. लंके यांनी दादाभाऊ कावरे व बुगेवाडीमधील युवकांचे कौतुक केले. यावेळी दादाभाऊ कावरे, गोटू कावरे आदी उपस्थित होते.
---
आमदार नीलेश लंके यांनी सामाजिक भावना म्हणून कोविड सेंटर उभे केले. त्यास आमचा हातभार लागावा म्हणून आम्ही आठ दिवस अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
-दादाभाऊ कावरे,
युवक, बुगेवाडी, पारनेर