शास्तीच्या थकबाकीत अंशत: सवलत
By Admin | Published: August 13, 2015 10:53 PM2015-08-13T22:53:53+5:302015-08-13T23:12:26+5:30
अहमदनगर : महापालिकेचा वसुलीचा टक्का वाढविण्यासाठी आयुक्तांनी शास्तीच्या थकबाकीत अंशत: सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदनगर : महापालिकेचा वसुलीचा टक्का वाढविण्यासाठी आयुक्तांनी शास्तीच्या थकबाकीत अंशत: सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी सवलत देऊनही अपेक्षित वसुली झाली नाही. त्यामुळे माफीचा हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त विलास ढगे यांनी आदेशात म्हटले आहे.
मालमत्ता, संकलित व इतर कराची वसुली नियमित व प्रभावीपणे होण्यासाठी शासनाने महापालिका अधिनियमात सुधारणा करून दोन टक्के शास्ती लागू करण्याचा निर्णय घेतला. तथापि या शास्तीत अंशत: अथवा पूर्णत: माफ करण्याचा अधिकार आयुक्तांना बहाल केला आहे., २०१० पासून अर्थिक वर्षाच्या शेवटी शास्ती करात सवलत देऊनही अपेक्षित वसुली झाली नाही. त्यामुळे आयुक्तांनी आॅगस्टपासूनच ७५ टक्के शास्तीमाफीचा निर्णय घेतला. आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे विलंबाने जे कर भरतात त्यांना शास्तीमध्ये सवलत देणे हे आर्थिक वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या सहामाहीच्या प्रारंभी कालावधीत शास्तीसह कर भरणाऱ्या करदात्याच्या दृष्टीने नैसर्गिक न्यायाचे नाही. ही बाब कर वसुलीस व थकबाकी वसुलीस प्रोत्साहन देणारी नाही. सवलत देऊनही शंभर टक्के वसुली होत नसल्याने कर व थकबाकीच्या रकमेत वर्षानुवर्षे वाढ झाल्याचे दिसते. त्यातच एलबीटी रद्द झाल्याने महापालिकेसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी आॅगस्टमध्येच शास्तीमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. तीन महिने शास्ती करात टप्प्याटप्प्याने सवलत मिळणार आहे.
(प्रतिनिधी)