अण्णांच्या आंदोलनात पारनेर तालुक्यातील माजी सैनिकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:54 PM2018-03-20T18:54:01+5:302018-03-20T18:56:42+5:30
या आंदोलनाला पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेने पाठिंबा दिला असून तालुक्यातील सर्व आजी, माजी सैनिकांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आव्हान पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सहदेव घनवट व निवृत्त कर्नल साहेबराव शेळके यांनी केले.
पळवे : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चला आपल्या विविध मागण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनाला पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेने पाठिंबा दिला असून तालुक्यातील सर्व आजी, माजी सैनिकांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आव्हान पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सहदेव घनवट व निवृत्त कर्नल साहेबराव शेळके यांनी केले.
पळवे खुर्द येथे निवृत्त सैनिक आंबादास तरटे यांनी आजी-माजी सैनिक सेवा संस्था स्थापन केली. या संस्था कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मंगळवारी निवृत्त कर्नल साहेबराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात आव्हान करण्यात आले. याप्रसंगी पारनेर तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष सहदेव घनवट, जय हिंद संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे, निवृत्त सैनिक अंबादास तरटे, जहीर शेख, संजय कौठाळे, काशीनाथ कळमकर, कैलास गाडीलकर, पळवेचे सरपंच नानाभाऊ गाडीलकर, उपसरपंच रामदास तरटे, विट्ठल कांडेकर, बबन गायकवाड, साहेबराव दिवटे, भिमाजी शेळके, भाउसाहेब तरटे, सलिम शेख, गोरख गाडीलकर, प्रसाद तरटे, शशिकांत देशमुख, रोहिदास गुंड, एकनाथ कुटे, प्रल्हाद जाधव, सोपान पवार, नामदेव शेळके, शांताराम तरटे, बाबासाहेब शेळके, सजंय शेलार उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय कौठाळे यांनी केले. अंंबादास तरटे यांनी आभार मानले.