योगासन क्रीडा स्पर्धेत व्हिडिओद्ववारे घेता येणार सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:26 AM2021-09-17T04:26:00+5:302021-09-17T04:26:00+5:30

ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा होणार असून, त्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून योगासनांच्या विविध पाच स्पर्धा प्रकारांचे व्हिडिओ मागविण्यात आले आहेत. अहमदनगर ...

Participation in Yogasana Sports Competition can be taken through video | योगासन क्रीडा स्पर्धेत व्हिडिओद्ववारे घेता येणार सहभाग

योगासन क्रीडा स्पर्धेत व्हिडिओद्ववारे घेता येणार सहभाग

ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा होणार असून, त्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून योगासनांच्या विविध पाच स्पर्धा प्रकारांचे व्हिडिओ मागविण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील योगासन खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अहमदनगर येथील उमेश झोटिंग व संगमनेर येथील नीलेश पठाडे यांच्याशी संपर्क साधावा. भारत सरकारने योगासनांना खेळाचा दर्जा दिल्यानंतर राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनच्या वतीने देशभरातील योगासन खेळाडूंसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने राज्यातील योगासन स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या स्पर्धत ९ ते १४, १४ ते १८ व १८ वर्षांपुढील मुला-मुलींचे स्वतंत्र तीन गट असतील. प्रत्येक गटात सहभागी स्पर्धकाचे वय ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतचे गृहीत धरले जाणार आहे.

पारंपरिक योगासन (वैयक्तिक), कलात्मक योगासन (वैयक्तिक व दुहेरी), तालात्मक योगासन (दुहेरी) व सांघिक कलात्मक (पाच खेळाडू) अशा पाच प्रकारांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतून प्रत्येक गटातील प्रत्येकी चौदा खेळाडूंची जिल्हास्तरावरून राज्य पातळीवर व राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात येणार आहे. १८ सप्टेंबरपर्यंत स्पर्धेसाठी नावे नोंदणी करता येणार असून, अधिकाधिक योगासन खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बापू पडाळकर व स्पर्धा संचालक सतीष मोहगावकर यांनी केले आहे.

Web Title: Participation in Yogasana Sports Competition can be taken through video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.