सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पॅसेंजर सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:53 AM2018-10-14T11:53:57+5:302018-10-14T11:55:07+5:30
२५ एप्रिलपासून बंद असलेल्या दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या चार पॅसेंजर डेटलाईन अखेर संपली.
विसापूर : २५ एप्रिलपासून बंद असलेल्या दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या चार पॅसेंजर डेटलाईन अखेर संपली. गेल्या सहा महीन्यात रेल्वे प्रशासनाकडून पॅसेंजर सुरु करण्याबाबत अनेक वेळा डेटलाईन देण्यात आली होती. परंतु तारीख पुढे ढकलण्यात येत होती.
प्रथम २५ एप्रिल ते १३ जुलै या पावणे तीन महिने कालावधीत पॅसेंजर बंद होत्या. आषाढी एकादशी निमित्ताने १४ जुलै ते ३१ जुलै अशा १७ दिवस रेल्वे प्रशासनाकडून पॅसेंजर सुरु करण्यात आल्या होत्या. आषाढी वारी संपल्यावर १ आॅगस्टपासून सुमारे सव्वादोन महीने बंद होत्या. आता मात्र रेल्वे प्रशासनाने नवरात्र, दसरा व दिवाळी या सनासुदीचे दिवसात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सकारात्मक निर्णय घेऊन सुमारे सहा महिने बंद असणा-या पॅसेंजर पुर्ववत चालू केल्या आहेत. सहा महीने दौंड -मनमाड रेल्वे मार्गावरील विसापूरसारखे रेल्वे स्थानके केवळ नावापुरती शिल्लक राहीली होती. प्रवाशांविना या स्थानकांवर सतत शुकशुकाट जाणवत होता. ही सर्व स्थानके केवळ क्रॉसिंग स्टेशन बनले होते. दौंड-मनमाड मार्ग अत्यंत जुना झाल्याने या मार्गावर दुरुस्तीचे अनेक ठिकाणी कामे चालू आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर बंद ठेवण्याचे धोरण सुरू केले.