बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:18 AM2021-01-22T04:18:56+5:302021-01-22T04:18:56+5:30
मिरज आगाराची बस ( एम.एच.१४, बी. टी.४८९९) नाशिकहून पुण्याला संगमनेर मार्गे निघाली होती. या बसमधून २६ प्रवासी प्रवास करत ...
मिरज आगाराची बस ( एम.एच.१४, बी. टी.४८९९) नाशिकहून पुण्याला संगमनेर मार्गे निघाली होती. या बसमधून २६ प्रवासी प्रवास करत होते.
दुपारी एकच्या सुमारास ही बस घारगाव येथील मुळानदीच्या पुलावर आली असता काही दुचाकी स्वारांच्या बसच्या इंजीन असलेल्या पुढील बाजूला लाग लागल्याचे दिसले. याबाबत त्यांनी बसचालकाला सांगितले. चालकाने प्रसंगावधान राखत बस सुरक्षितरित्या महामार्गाच्या बाजूला उभी करत प्रवाशांना तात्काळ खाली उतरविले. घारगाव येथील नवनाथ गाडेकर, सोमनाथ गांडाळ, महेश घाटकर, अमीर शेख या तरूणांनी तसेच बसचालकाने माती, पाणी टाकून आग विझवली. यावेळी चालक अमोल ज्ञानेश्वर नांदूरकर यांचा हात किरकोळ भाजला. वायरमध्ये शॉर्टसर्कीट होवून आग लागली होती. घारगाव येथील तरूण व बसचालकाच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या बसमधून प्रवास करणाऱ्यांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले.
------------
फोटो नेम : घारगाव बस
ओळ : बसला लागलेली आग
ओळ : नाशिक-मिरज बस.