जिथे इच्छा तिथे मार्ग आपोआप दिसतो-काजल देशमुख; आयईएस परीक्षेत देशात मुलींमध्ये प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:37 PM2019-11-02T18:37:51+5:302019-11-03T12:55:29+5:30

नेवासा शहरातील काजल दीपक देशमुख हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत मॅकेनिकल इंजिनिअरिंग परीक्षेत भारतात ८७ जणांची निवड झाली. त्यामध्ये काजल ही  एकमेव. तिने मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले आहे. यानिमित्ताने तिच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.

The path automatically appears wherever it wishes - Kajal Deshmukh; The first among the girls in the country in the IES exam | जिथे इच्छा तिथे मार्ग आपोआप दिसतो-काजल देशमुख; आयईएस परीक्षेत देशात मुलींमध्ये प्रथम 

जिथे इच्छा तिथे मार्ग आपोआप दिसतो-काजल देशमुख; आयईएस परीक्षेत देशात मुलींमध्ये प्रथम 

संडे मुलाखत / सुहास पठाडे 

नेवासा : सरकारी नोकरी मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट होते. त्यातच आई-वडिलांनी शिक्षणासाठी दिलेली साथ व मैत्रिणीच्या मार्गदर्शनाच्या जोरावर नेवासा शहरातील काजल दीपक देशमुख हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत मॅकेनिकल इंजिनिअरिंग परीक्षेत भारतात ८७ जणांची निवड झाली. त्यामध्ये काजल ही  एकमेव. तिने मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले आहे. यानिमित्ताने तिच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.
प्रश्न : तुला प्रेरणा कोणाची
काजल :वडील दीपक देशमुख हे निवृत्त सैन्य दलातील सैनिक आहेत. आई शोभाताई गृहिणी आहेत. दोन बहिणी व एक भाऊ आहे. वडिलांनी आम्हाला उच्च शिक्षित बनविण्यासाठी मोठे कष्ट घेतले. त्यांचे कष्ट हीच माझी खरी प्रेरणा आहे.
प्रश्न : शालेय शिक्षण कुठे झाले?
काजल : प्राथमिक शिक्षण नेवासा शहरातील प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण सुंदरबाई कन्या विद्यालय येथे झाले. दहावीत ९५ टक्के गुण मिळवत तालुक्यात पहिली आले. नगर येथील रेसिडेंशीअल स्कूलमध्ये १२ वी परिक्षेत ९० टक्के गुण व सीईटी परीक्षेत १७८ गुण मिळवले. पुणे येथे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या शासकीय महाविद्यालयात इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्षे वाराणसी येथील आदित्य बिर्ला ग्रुपच्या हिंदलको कंपनीत नोकरी केली. कंपनीत केलेल्या उकृष्ठ कामाबद्दल  ‘एम इंजिनिअर’ हा पुरस्कार मिळाला.
प्रश्न : आयईएस परीक्षेकडे कशी वळाली?
काजल : सरकारी नोकरीच करायची अशी पहिल्यापासून मनाशी खूणगाठ बांधली होती. आई.इ.एस. परीक्षा देण्यासाठी मैत्रिणीने केलेल्या आग्रहामुळे नोकरीचा राजीनामा देत पुन्हा पुणे गाठले. तेथे आल्यानंतर जेट आणि आईएसचे कोचिंग सुरू केले. वाराणसी येथील कंपनीतील वरिष्ठ मनोज शर्मा व डोंगरगण येथील मैत्रीण प्राची भूतकर हिने मार्गदर्शन केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (इंजिनिअर सर्व्हिसेस) जानेवारी महिन्यात प्राथमिक परीक्षा दिली. नंतर अभ्यासासाठी दिल्ली येथे राहणे पसंत केले. जून महिन्यात मुख्य परीक्षेत यश मिळविले. सप्टेंबर महिन्यात मुलाखत झाली. आॅक्टोबरमध्ये  निकाल लागला आणि मुलींमध्ये देशात पहिला येण्याचा मान मिळाला.
रेल्वे आवडते क्षेत्र
रेल्वे हे माझे आवडते क्षेत्र आहे. तेथे नोकरीच्या संधी मोठ्या आहेत. या परिक्षेमुळे रेल्वेमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद आहे. मला मैत्रिणींचा सल्ला मोलाचा ठरला. वडील आर्मीत असल्याने पहिल्यापासून आईवरच आमच्या शिक्षणाची जबाबदारी होती. आईने शिक्षणाच्या बाबतीत सर्व भावंडांकडे लक्ष दिले. इच्छा आणि मेहनत याचा संगम झाला, असे काजल सांगते.
आईलाही अभिमान
ग्रामीण भागात राहत असताना मुलीने यश संपादन केल्याचा आईलाही खूप अभिमान वाटत आहे. मुला-मुलीत भेदभाव न करता ग्रामीण भागातील पालकांनी मुलींनाही उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे. कुटुंबाबरोबरच नेवाशाचे ही नाव मोठे केले असल्याचा आईला अभिमान वाटत आहे, असे काजल म्हणाली.

‘‘आईने शिक्षणाच्या बाबतीत सर्व भावंडांकडे लक्ष दिल्यानेच हे यश संपादन करू शकले. जिथे इच्छा तिथे मार्ग दिसतो. मी जसे यश संपादन केले, तसे दुसरी कुठलीही मुलगी यश संपादन करू शकते.’’
-  काजल देशमुख.
 

Web Title: The path automatically appears wherever it wishes - Kajal Deshmukh; The first among the girls in the country in the IES exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.