पाथर्डीत भाजप कार्याकर्त्यांत हाणामारी, सुजय विखे अन् पंकजा मुंडे समर्थक भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 10:34 PM2019-06-04T22:34:13+5:302019-06-04T22:34:58+5:30

मुंडे समर्थक राहुल कारखेले यांनी खासदार विखेंना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला.

In Pathardi, BJP activists clashed with supporters, Sujay Wikhe patil and Munde supporters | पाथर्डीत भाजप कार्याकर्त्यांत हाणामारी, सुजय विखे अन् पंकजा मुंडे समर्थक भिडले

पाथर्डीत भाजप कार्याकर्त्यांत हाणामारी, सुजय विखे अन् पंकजा मुंडे समर्थक भिडले

पाथर्डी (जि. अहमदनगर) : माजी आमदार दगडू पाटील बडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंचपूर पांगुळ (ता. पाथर्डी) येथील कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांच्यासमोरच विखे समर्थक अजय रक्ताटे व पंकजा मुंडे यांचे समर्थक राहुल कारखेले यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. 

मुंडे समर्थक राहुल कारखेले यांनी खासदार विखेंना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. त्यावेळी रक्ताटे यांनी विखे यांना वाहनाकडे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारखेले म्हणाले, ‘रक्ताटे हे काँग्रेसचे आहेत, त्यांचे ऐकू नका.’ त्याचवेळी रक्ताटे म्हणाले, ‘कारखेले, तुम्ही तरी कुठे भाजपचे आहात’? याचा राग आल्याने कारखेले यांनी रक्ताटे यांच्या श्रीमुखात भडकावली. त्यांची ही हाणामारी पाहून उपस्थित अवाक झाले. उपस्थितांनी भांडणे सोडविली. परंतु विखे पाथर्डीतून निघून गेल्यानंतर सायंकाळी रक्ताटे यांनी राहुल कारखेले यांच्या दुकानात सहकारी युवकांसोबत जाऊन पुन्हा राडा केला. तसेच कारखेले यांना मारहाण केली. त्यामुळे काही काळ बाजारपेठेत वातावरण तणावपूर्ण झाले होते. 

अखेर भाजपच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात फिर्यादी देण्यासाठी पोहचले. पण भाजपच्या इतर पदाधिकाºयांनी हे वाद मिटवून त्यावर पडदा टाकला. पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी रक्ताटे व कारखेले यांचे भांडण मिटल्याचे जबाब नोंदवून दोघांनाही शांतता राखण्याची समज दिली. घटनेची माहिती मिळताच शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

Web Title: In Pathardi, BJP activists clashed with supporters, Sujay Wikhe patil and Munde supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.