पाथर्डी पालिकेचा ‘तो’ मद्यधुंद स्वच्छता निरीक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 01:10 PM2019-12-04T13:10:14+5:302019-12-04T13:10:48+5:30
कार्यालयीन कामकाजाच्या वेळी दारू पिऊन कर्मचा-यांना व नागरिकांना अरेरावी केल्याप्रकरणी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे.
पाथर्डी : कार्यालयीन कामकाजाच्या वेळी दारू पिऊन कर्मचा-यांना व नागरिकांना अरेरावी केल्याप्रकरणी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड हे सोमवारी दुपारी पालिका कार्यालयात गेले होते. या माहितीशी संबंधित पालिकेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांना याबाबत विचारणा केली असता ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे किसन आव्हाड यांच्या लक्षात आले. त्यांनी सदर प्रकार हा कार्यालय निरीक्षक आयुब सय्यद यांना यांचे निदर्शनास आणून दिला. मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना फोनवरून स्वच्छता निरीक्षक मद्यधुंद स्वच्छता निरीक्षकावर कारवाईची मागणी केली. त्यानुसार ढवळे यांची इतर कर्मचाºयांनी खात्री केली असता ते मद्यधुंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याकामी पाथर्डी पोलिसांना पत्र देण्यात आले. परंतु सदरील प्रकाराचे गांभीर्य लक्षात येताच काही पालिकेतील कर्मचा-यांनी स्वच्छता निरीक्षक ढवळे यांना पालिकेतून पळून जाण्याचा सल्ला दिला. काही वेळान पोलीस आल्यानंतर दत्तात्रय ढवळे कार्यालयात आढळून आले नाहीत. त्यांना फोनवर संपर्क केला असता त्यांचा फोन बंद आढळून आला. पोलिसांनी ढवळे यांचा शोध घेतला, परंतु ढवळे आढळून न आल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करता आली नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. त्याच अनुषंगाने मंगळवारी मुख्य अधिकारी धनंजय कोळेकर यांनी स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांना निलंबित करीत असल्याबाबतचा आदेश काढला आहे.