शिर्डीतील रूग्णाच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 04:55 PM2020-06-28T16:55:45+5:302020-06-28T16:56:26+5:30
दोन दिवसांपूर्वी शिर्डीत आढळलेल्या कोरोना रूग्णाच्या संपर्कातील २६ जणांचा स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.
शिर्डी: दोन दिवसांपूर्वी शिर्डीत आढळलेल्या कोरोना रूग्णाच्या संपर्कातील २६ जणांचा स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.
२६ जून रोजी शिर्डीतील एका रूग्णाला संसर्ग झाल्याचे समोर आले होते. हा रूग्ण साईबाबा संस्थान कर्मचारी आहे. या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या २६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल रविवारी दुपारी प्रशासनाला प्राप्त झाला.
रूग्णाच्या पत्नीसह कुटुंबातील नऊ व शेजारच्या चार जणांचा समावेश होता. याशिवाय रूग्णालयातील डॉक्टरांसह १३ वैद्यकीय कर्मचा-यांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.
रूग्णाने संस्थानच्या साईनाथ रूग्णालयात उपचार घेतले असल्याने येथील डॉक्टरांसह २१ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती हिरे यांनी दिली.