रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४४ टक्के; ६३८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 03:14 PM2020-09-06T15:14:53+5:302020-09-06T15:15:16+5:30

अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (६ सप्टेंबर) तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४४ टक्के इतके झाले आहे.

The patient recovery rate is 86.44 percent; 638 patients were discharged | रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४४ टक्के; ६३८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४४ टक्के; ६३८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी (६ सप्टेंबर) तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४४ टक्के इतके झाले आहे.

 दरम्यान, शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणा-या रुग्णांची संख्या आता ३ हजार ४६ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार १८५ झाली आहे. तर आतापर्यंत ३६९ जणांचा मृत्यू झाला आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३२, संगमनेर १, राहाता १,  पाथर्डी २, नगर ग्रामीण १, श्रीरामपूर २, कँटोन्मेंट १, नेवासा ६, श्रीगोंदा ३, पारनेर ३, अकोले  १७, कोपरगाव १, जामखेड २, कर्जत १ आणि मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती  जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
 

Web Title: The patient recovery rate is 86.44 percent; 638 patients were discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.