स्वरमयी सांजधारा कार्यक्रमाने रुग्ण मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:48+5:302021-05-30T04:18:48+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील कोविड सेंटरमध्ये आयोजित केलेल्या स्वरमयी सांजधारा गीतांच्या कार्यक्रमाने रुग्ण श्रोते मंत्रमुग्ध झाले. आतापर्यंत ...
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील कोविड सेंटरमध्ये आयोजित केलेल्या स्वरमयी सांजधारा गीतांच्या कार्यक्रमाने रुग्ण श्रोते मंत्रमुग्ध झाले. आतापर्यंत येथून ९० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. संगीत विशारद, सारंग दंडवते यांनी तबला वादक शरद रूपनर व गायक जालिंदर वेताळ यांच्या साथीने गणपती स्तवन, भावगीत, भक्तीगीत, अभंग, गवळण, चित्रपट गीते यांचे उत्कृष्ट सादरीकरण करून कोरोना रुग्णांना मंत्रमुग्ध केले. रुग्णांची तणावापासून मुक्तता व्हावी. त्यांचे मनोबल वाढावे यासाठी येथे विविध उपक्रम राबवले जातात. सूत्रसंचालन कलाकार संदीप बोरगे यांनी केले. अतुल लोखंडे यांनी आभार मानले.
290521\img_20210528_202222.jpg
देवदैठण येथे सारंग दंडवते व सहकाऱ्यांनी विविध गीतांचा स्वरमयी सांजधारा कार्यक्रम सादर केला . ( छायाचित्र -संदीप घावटे )