संगमनेर, नेवासा, पारनेरात रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:23 AM2021-05-20T04:23:02+5:302021-05-20T04:23:02+5:30
अहमदनगर : दोन दिवस निम्म्याने कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली. बुधवारी जिल्ह्यात ३७७९ रुग्णांची वाढ झाली. संगमनेर, नेवासा, ...
अहमदनगर : दोन दिवस निम्म्याने कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली. बुधवारी जिल्ह्यात ३७७९ रुग्णांची वाढ झाली. संगमनेर, नेवासा, पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढले, तर नगर शहरात रुग्णसंख्या कमी झाली आहे. रुग्ण वाढल्याने उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २० हजार १०७ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आज २६८४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख १७ हजार ०३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.५५ टक्के इतके झाले आहे. बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४४९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९६८ आणि अँटिजन चाचणीत १३६२ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (१९०), राहाता (२६४), संगमनेर (६१७), श्रीरामपूर (१६८), नेवासा (४०२),नगर तालुका (२६४),पाथर्डी (१९२), अकोले (२५०), कोपरगाव (१४१), कर्जत (१७१), पारनेर (३१७), राहुरी (१७१), भिंगार (१२), शेवगाव (२३४), जामखेड (११०), श्रीगोंदा (२०९), इतर जिल्हा (६१), इतर राज्य (१), मिलिटरी हॉस्पिटल (५), अशा ३७७९ रुग्णांची संख्या आहे. दरम्यान, २४ तासात २७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
---
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : २,१७,०३०
उपचार सुरू असलेले रुग्ण : २०१०७
मृत्यू : २५४३
एकूण रुग्णसंख्या : २,३९,६८०