अहमदनगरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने रुग्णांचा जीव गॅसवर, ऑक्सिजनचा पुरवठा नेहमीइतकाच, मागणी वाढल्याने तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 09:59 AM2020-08-09T09:59:46+5:302020-08-09T10:00:52+5:30
अहमदनगर : पुणे, मुंबई आणि चाकण.येथून येणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा जीव सध्या गॅसवर आहे. शनिवारी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध न झाल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. रोज चारशेच्यावर बाधित रुग्ण आढळून येत आहेत.

अहमदनगरमध्ये ऑक्सिजनचे उत्पादन करणारा एकही प्रकल्प नाही. द्रव स्वरुपातून गॅस स्वरुपात ऑक्सिजन तयार करणारे सर्व प्रकल्प पुणे, मुंबई व चाकण येथे आहेत. तेथे तयार झालेल्या ऑक्सिजनचा पुरवठा नगरला केला जातो. नगरमध्ये तीन ते चार प्रकल्प आहेत की जे तो ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरून जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयाना पुरवठा केला जातो. ऑक्सिजनची निर्मिती पूर्वीइतकीच आहे. मात्र कोविडचे रुग्ण वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने नगरमध्ये पाहिजे तेवढा ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याचे दिसते आहे..यामुळे रुग्णांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.
जिल्हा रुग्णालयात रोज मोठे व छोटे सिलेंडरची मागणी 80 ते 100 होती. ती मागणीही आता दुप्पट झाली आहे. रोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सिलेंडरलाही मागणी वाढत असून तेवढी उपलब्धता नसल्याने पुरवठादारही चिंतेत आहेत.
पुणे, मुंबईमध्येही रुग्णसंख्या वाढत असल्याने तेथील स्थानिक पुरवठादार स्थानिक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करीत असून नगरला येणारा ऑक्सीजन पुरवठा कमी झाल्याचे पुरवठादारानी लोकमतला सांगितले.