लंगर सेवेच्या वतीने आता घरपोहोच मिळणार रुग्णांना ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:21 AM2021-05-13T04:21:22+5:302021-05-13T04:21:22+5:30
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, घर घर लंगर सेवा सर्वसामान्य घटक व शासन यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे. गरज ...
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, घर घर लंगर सेवा सर्वसामान्य घटक व शासन यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे. गरज तिथे लंगर सेवेचे सेवादार पोहोचत आहेत. ऑक्सिजनची गरज ओळखून देवदूताप्रमाणे लंगर सेवा सर्वसामान्यांचे प्राण वाचविण्यासाठी पुढे सरसावली आहे. पोलीस प्रशासनालादेखील लंगर सेवेच्या कार्यातून स्फूर्ती मिळत आहे.
या लंगर सेवेच्या सेवादारांच्या कार्यातून स्फूर्ती मिळत असल्याची भावना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने नि:शुल्क घर घर ऑक्सिजन सेवेचा शुभारंभ पोलीस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. हॉटेल अशोका येथे झालेल्या या उपक्रमाप्रसंगी लंगर सेवेचे सेवादार उपस्थित होते.
हरजितसिंह वधवा म्हणाले सध्या कोरोना रुग्णांसाठी त्यांचे नातेवाईक ऑक्सिजन बेडसाठी धावाधाव करीत आहे. सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये, यासाठी घर घर लंगर सेवेच्या वतीने ऑक्सिजन देण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी उद्योजक रामचंद्र भट व सिध्दार्थ भट यांचे विशेष आर्थिक सहयोग मिळाला आहे. रुग्णाला जोपर्यंत ऑक्सिजन बेड मिळत नाही. तोपर्यंत लंगर सेवेने रुग्णांसाठी दिलेला ऑक्सिजन कॅन (बॉटल) जीवनदायी ठरणार आहेत. ऑक्सिजन कॅन वापरण्यास सोपे असून, स्प्रेसारखा त्याचा उपयोग करून रुग्णाची ऑक्सिजन पातळी वाढवता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमासाठी हरजितसिंग वधवा, जनक आहुजा, राहुल बजाज, प्रीतिपालसिंग धुप्पड, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, कैलास नवलानी, राहुल बजाज, राजा नारंग, सतीश गंभीर, राजेंद्र कंत्रोड, सनी वधवा, आदित्य छाजेड, कबीर धुप्पड आदी योगदान देत आहेत.
-------------------------------
फोटो १२ लंगरसेवा
ओळी- गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने नि:शुल्क घर घर ऑक्सिजन सेवेचा शुभारंभ पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी हरजितसिंग वधवा, जनक आहुजा, राहुल बजाज, प्रीतीपालसिंग धुप्पड, किशोर मुनोत, डॉ.सिमरन वधवा, रामचंद्र भट, सिध्दार्थ भट, प्रशांत मुनोत, कैलास नवलानी, राहुल बजाज, राजा नारंग, सतीश गंभीर, राजेंद्र कंत्रोड, सनी वधवा, आदित्य छाजेड, कबीर धुप्पड आदी.