चिचोंडी पाटीलमध्ये पविते अर्पण सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:16+5:302021-08-23T04:24:16+5:30

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील श्रीकृष्ण मंदिरात पविते अर्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी ...

Pavite Arpan ceremony in Chichondi Patil with enthusiasm | चिचोंडी पाटीलमध्ये पविते अर्पण सोहळा उत्साहात

चिचोंडी पाटीलमध्ये पविते अर्पण सोहळा उत्साहात

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील श्रीकृष्ण मंदिरात पविते अर्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दरवर्षी नारळी पौणिमेच्या पूर्वसंध्येस भाविक श्रीकृष्णास पवितेरूपी राखी अर्पण करतात. परंपरेनुसार श्रीफळ, सुपारी, दोरा, लोकर आदींसह अन्य वस्तूंचा उपयोग करून भक्त पविते तयार करतात. हा उत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमीपर्यंत सुरू राहतो.

चिचोंडी पाटीलचे पुजारी धाराशीवकर बाबा ऊर्फ वसंतराव ठोंबरे (चिचोंडीकर) यांच्याहस्ते सकाळी तीर्थस्थानास मंगलस्नान घालण्यात आले. यावेळेस पुजारी हरिभाऊ ठोंबरे, लक्ष्मीकांत ठोंबरे, रमेश ठोंबरे, संजय ठोंबरे, चक्रपाणी ठोंबरे, राजेंद्र ठोंबरे, उषाबाई ठोंबरे, वृषाली ठोंबरे, स्मिता ठोंबरे, शैलजा ठोबरे, भाग्यश्री ठोंबरे, मोहिनी ठोंबरे आदी उपस्थित होत्या.

रात्री आठ वाजता विडा अवसर करून चिचोंडी पाटील आणि धामणगाव (ता. आष्टी) येथील भाविक-भक्त यांच्या उपस्थितीत पविते अर्पण करून पविते पर्वाचा आरंभ करण्यात आला. यावेळी गंगाधर दरेकर, सुनील शिंदे, आदित्य शिंदे, वंदना शिंदे, मीना औटी, मयुरी उदरभरे, प्रियंका शिंदे, सुप्रिया शिंदे, धामणगाव येथील बेलाजी बोराडे, देवीचंद बोराडे, भूषण बोराडे, समृद्धी बोराडे, प्रथमेश बोराडे, स्नेहल बोराडे, शौर्य बोराडे, अर्चना बोराडे, ऋषिकेश ठोंबरे, आनंद ठोंबरे, सुदर्शन ठोंबरे, सुयश ठोंबरे, निखिल ठोंबरे, तेजस ठोंबरे, अनिकेत औटी, प्रमोद ओटी, सार्थक ठोबरे, प्राची उदरभरे, समीक्षा उदरभरे, श्रेया उदरभरे आदींनी परमेश्वरचरणी पविते अर्पण केले.

Web Title: Pavite Arpan ceremony in Chichondi Patil with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.