जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष द्या

By | Published: December 6, 2020 04:21 AM2020-12-06T04:21:16+5:302020-12-06T04:21:16+5:30

याप्रसंगी केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, हसनापूरच्या प्रगतिशील शेतकरी अब्बास पटेल, रामभाऊ ...

Pay attention to soil health | जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष द्या

जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष द्या

याप्रसंगी केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, हसनापूरच्या प्रगतिशील शेतकरी अब्बास पटेल, रामभाऊ कोठुळे, उज्ज्वला तांबे, कृषी अधिकारी नारायण लोळगे, सागर क्षीरसागर, सचिन गायकवाड तसेच आत्माचे व्यवस्थापक किशोर कडू, राजदत्त गोरे आदी उपस्थित होते.

विखे म्हणाल्या, शेतकरी उत्पन्नवाढीसाठी अनेक प्रयोग करतात. जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. आज काही ठिकाणी भाजीपाला फळांवर भरमसाठ विषारी औषधे वापरली जातात. याचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. म्हणून, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्राचे मृदविज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे यांनी मृदा दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमप्रसंगी चंद्रपूर येथे नव्याने स्थापन झालेल्या दोन पुरुष आणि एका महिला बचत गटाचे स्वागत करण्यात आले. विखे यांच्या हस्ते भू-मातेचे पूजन आणि कृषिभूषण गोल्ड या गांडूळ खत प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. सूत्रसंचालन विस्तार शास्त्रज्ञ सुनील बोरुडे यांनी केले. तर तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Pay attention to soil health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.