पगारवाढसाठी तारीख पे तारीख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:24 AM2021-01-16T04:24:23+5:302021-01-16T04:24:23+5:30
यावेळी युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, ...
यावेळी युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, किशोर कांबळे, प्रविण भिंगारदिवे आदींसह कामगार उपस्थित होते.
अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च २०२० मध्ये संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे. कोरोना महामारीचे कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना मागणीप्रमाणे वेतनवाढ देत नसल्याचा आरोप युनियनने केला आहे. सदर प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी सहा ते सात तारखा झाल्या. यापैकी एकाच तारखेला विश्वस्तांनी हजेरी लावून कामगारांना दरमहा तीन हजार दोनशे तीन वर्षासाठी वाढ देण्यास सहमती दर्शवली. मात्र कामगारांना अत्यंत कमी पगार असल्याने ही पगारवाढ परवडणारी नसल्याने त्याला विरोध करण्यात आला. सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी युनियनला पुढील सदर प्रकरणाची २१ जानेवारीची अंतिम तारीख दिली आहे.
फोटो १५ आंदोलन
ओळी-अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कामगारांचे वेतन वाढीचे प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे असताना चर्चेला विश्वस्त येत नसल्याने संतप्त कामगारांनी कार्यालयासमोर ठिय्या देत निषेध नोंदविला.