स्वीकृत नगरसेवकपदी मयूर चुत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:25 AM2021-02-17T04:25:44+5:302021-02-17T04:25:44+5:30
पीठासीन अधिकारी प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. नगरसेविका नंदा बाळासाहेब उंडे यांच्या ...
पीठासीन अधिकारी प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
नगरसेविका नंदा बाळासाहेब उंडे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाच्या स्वीकृत नगरसेवक मज्जूभाई कादरी यांनी स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता तो मंजूर झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड झाली आहे. जनसेवा मंडळाच्या गटनेत्या नंदा उंडे यांनी मयूर चुत्तर यांच्या अर्जाला सूचक आहेत. नगराध्यक्ष अनिता पोपळघट, विरोधी गटनेते शिवाजी सोनवणे, गटनेत्या डॉ. उषाताई तनपुरे, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी व सर्व नगरसेवक यावेळी हजर होते. स्वीकृत नगरसेवक डॉ. मयूर चुत्तर तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अरुण तनपुरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख, संतोष लोढा यावेळी हजर होते. मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुऱ्हे यांनी आभार मानले.