बनावट नोटांसाठीचा पेन ड्राईव्ह १६ लाखांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 05:16 AM2019-11-13T05:16:16+5:302019-11-13T05:16:20+5:30

बनावट नोटा प्रकरणातील म्होरक्या श्रीकांत माने याला पुण्यातील ‘त्या’ महिलेने पुढे घालून बारामतीतील एका सावकाराकडून १६ लाख उकळले.

Pen drive for fake notes is 2 lakhs | बनावट नोटांसाठीचा पेन ड्राईव्ह १६ लाखांचा

बनावट नोटांसाठीचा पेन ड्राईव्ह १६ लाखांचा

बाळासाहेब काकडे 
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : बनावट नोटा प्रकरणातील म्होरक्या श्रीकांत माने याला पुण्यातील ‘त्या’ महिलेने पुढे घालून बारामतीतील एका सावकाराकडून १६ लाख उकळले. तिने ते पैसे माने याला देण्यास टाळाटाळ केली. या बदल्यात माने यास महिलेने बनावट नोटांचा कॉपी असलेला पेन डार्ईव्ह दिला, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे बनावट नोटांच्या छपाई प्रकरणात सात जणांना अटक झालेली आहे. श्रीगोंदा पोलिस तपास करीत आहेत. बनावट नोटा तयार करण्याच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी श्रीकांत माने अडचणीत असलेल्या माणसाला २० हजारांच्या मोबदल्यात एक लाखाच्या बनावट नोटा देत होता. त्यासाठी त्याने तालुकावार एजंट नेमले होते.
पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील शिवाजी जरे याच्यामार्फत श्रीगोंदा तालुक्यात त्याने बनावट नोटांचे वितरण केले. शिवाजी जरे हा पांढरे कपडे घालून नेत्यांमध्ये वावरत असे. नेहमी पैशांत खेळणारा व्यक्ती म्हणून त्याची ओळख होती.
>दोघे झाले गजाआड
शिवाजी जरे याने घारगावमधील अण्णासाहेब खोमणे व सलीम सय्यद यांना बनावट नोटा दिल्या होत्या. पोलिसांनी मंगळवारी अण्णासाहेब खोमणे व सलीम सय्यद यांना अटक केली. त्यांच्याकडून २,२०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावीत यांनी दिली.

Web Title: Pen drive for fake notes is 2 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.