विनापरवाना अन्नपदार्थ विकणा-यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:06 PM2019-11-02T18:06:23+5:302019-11-02T18:07:00+5:30

अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत परवाना न घेता अन्नपदार्थ विक्री करणाºया पारनेर तालुक्यातील पोखरी येथील पंधरा व्यवसायिकांवर अन्न, औषध प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली़. 

Penal action against unregistered food vendors | विनापरवाना अन्नपदार्थ विकणा-यांवर दंडात्मक कारवाई

विनापरवाना अन्नपदार्थ विकणा-यांवर दंडात्मक कारवाई

अहमदनगर: अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत परवाना न घेता अन्नपदार्थ विक्री करणाºया पारनेर तालुक्यातील पोखरी येथील पंधरा व्यवसायिकांवर अन्न, औषध प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली़. 
अन्न, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं़पां़ शिंदे व अन्नसुरक्षा अधिकारी का़ सू़ शिंदे यांच्या पथकाने ९ आॅक्टोबर रोजी पोखरी येथे ही तपासणी मोहिम राबविण्यात आली होती़. यावेळी गावातील किराण दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांकडे अन्नपरवाना नसल्याचे समोर आले़. या सर्व व्यवसायिकांना नोटीस देत त्यांची १ नोव्हेंबर रोजी येथील अन्न, औषध प्रशासन विभागात सुनावणी घेण्यात आली़. यावेळी प्रत्येकाला त्यांच्या व्यवसायानुसार ५०० रुपये तर १२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला़. या कारवाईत एकूण ३४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला़. व्यवसायिकांनी दंडाची रक्कम तत्काळ भरून अन्नपरवान्यासाठी अर्ज केला़. 
जिल्हाभरातील व्यवसायिकांचे परवाने तपासणार 
अन्नपदार्थ विक्री करणाºया व्यवसायिकाने अन्नसुरक्षा विक्रीचा परवाना घेणे आवश्यक आहे़. यातून अन्न, औषध प्रशासनाकडे संबंधित व्यवसायांची नोंदनी राहते़ प्रत्यक्षात मात्र बहुतांशी विक्रेत्यांकडे असे परवाने नाहीत़. यासाठी अन्न, औषध प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरात तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे़. ज्यांच्याकडे अन्नविक्रीचे परवाने नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त सं़पां़ शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़. 

Web Title: Penal action against unregistered food vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.