हेल्मेट न घालणा-या 118 पोलीसांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 06:23 PM2019-03-19T18:23:10+5:302019-03-19T18:24:58+5:30

हेल्मेट न वापरणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारत ११८ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे़

Penalty for 118 police officers not wearing helmets | हेल्मेट न घालणा-या 118 पोलीसांना दंड

हेल्मेट न घालणा-या 118 पोलीसांना दंड

अहमदनगर: हेल्मेट न वापरणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारत ११८ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे़ मंगळवारी सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात वाहतूक शाखेच्या अधिका-यांनी हेल्मेटसह, सिटबेल्ट व विनापरवाना वाहन चालविणा-यांवर कारवाई केली.
पोलीस प्रशासनाने १ डिसेंबर पासून २०१८ पासून नगर शहरात हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती केली आहे़ हेल्मेट सक्तीचे मात्र पोलीसांकडूनच उल्लंघन होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वाहतूक शाखेला अधीक्षक कार्यालयात तपासणी मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते़ सोमवारी सकाळी ९ वाजेपासून वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील तिनही प्रवेदशद्वाराजवळ ठाण मांडून बसले होते़ हेल्मेट घालून न येणा-या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला़ सीटबेल्ट न वापरणा-या अधिका-यांच्या वाहनांवरील चालकांनांनाही दंड करण्यात आला़ वाहनांचा इन्शुरन्स व परवाना नसणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ कारवाई झालेल्यांमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, इतर विभागातील कर्मचारी व काही वकिलांचाही समावेश आहे़

 

Web Title: Penalty for 118 police officers not wearing helmets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.