कोपरगावात लोकांनी केले अनोखं आंदोलन; नगर परिषदेच्या आवारात सामूहिकरित्या प्रतिकात्मक मूत्र विसर्जन

By रोहित टेके | Published: May 9, 2023 11:44 AM2023-05-09T11:44:46+5:302023-05-09T11:44:57+5:30

महिला करिता एवढ्या मोठ्या शहरात भाजी मार्केटमध्ये एकमेव स्वच्छता गृह आहे. अनेक व्यापारी व नागरिक यांनी वारंवार नगर पालिकेकडे स्वच्छता गृहाची मागणी केली.

People did a unique movement in Kopargaon; Collective symbolic urination in the city council premises | कोपरगावात लोकांनी केले अनोखं आंदोलन; नगर परिषदेच्या आवारात सामूहिकरित्या प्रतिकात्मक मूत्र विसर्जन

कोपरगावात लोकांनी केले अनोखं आंदोलन; नगर परिषदेच्या आवारात सामूहिकरित्या प्रतिकात्मक मूत्र विसर्जन

कोपरगाव (जि. अहमदनगर ): शहरातील मुख्य चौकात महिला व पुरुषासाठी स्वच्छता गृह बांधावे या मागणीसाठी लोक स्वराज्य आंदोलनसह सर्व सामान्य नागरिक, बाजार पेठेतील व्यापारी यांच्यावतीने कोपरगाव नगर परिषदेच्या आवारात मंगळवारी (दि. 9) सकाळी ११ वाजता सामूहिक प्रतीकात्मक मूत्र विसर्जन आंदोलन करण्यात आले. 

यावेळी आंदोलक म्हणाले, कोपरगाव शहरात मूख्य रस्त्या लगत पुरुषांसाठी स्वच्छता गृहे होती; मात्र विकास कामाच्या गदारोळात ही स्वच्छता गृहे नगर पालिकेने काढून टाकले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या बाजूला असलेले स्वच्छता गृहाशेजारी नवीन इमारतिच्या पायाची खोदाई करताना काही दिवसापूर्वी पडले. मात्र, त्यामुळे परिसरातील नागरिक व व्यापारी यांची मोठी गैरसोय होत आहे.  

तसेच महिला करिता एवढ्या मोठ्या शहरात भाजी मार्केटमध्ये एकमेव स्वच्छता गृह आहे. अनेक व्यापारी व नागरिक यांनी वारंवार नगर पालिकेकडे स्वच्छता गृहाची मागणी केली. मात्र आठ दिवस झाले तरी नागरिक, व्यापारी यांच्या मागणीकडे नगर पालिका अक्षम्य दुर्लक्ष करत असून कोपरगाव शहरातही महिला व पुरुषांना लघुशंका करण्यासाठी स्वच्छता गृह त्वरित बांधावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगर परिषदेचे उपमुख्यधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी लोक स्वराज्य आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष अँड. नितीन पोळ,काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नितीन शिंदे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे, मनसेचे संतोष गंगवाल, माजी नगरसेवक अनिल आव्हाड, शेतकरी कृती समितीचे तुषार विध्वंस, भूमी पुत्र फाउंडेशनचे निसार शेख, भोई समाज संघटनेचे समाजसेवक अर्जुन मोरे, उमेश धुमाळ, रफिक बागवान, अफजल मौलाना यांच्यासह व्यापारी बांधव, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: People did a unique movement in Kopargaon; Collective symbolic urination in the city council premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.