जनतेने कोरोनाला घाबरून न जाता शासन नियमांचे पालन करा: शंकरराव गडाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 02:40 PM2020-08-04T14:40:27+5:302020-08-04T14:41:08+5:30

नेवासा  : नेवासा तालुक्यातील जनतेने कोरोनाला घाबरून न जाता शासन नियमांचे पालन करून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी सज्ज व्हा. शनिशिंगणापूर येथे पुढील उपचाराच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली असल्याची माहिती जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

People should not be afraid of Corona and follow government rules: Shankarrao Gadakh | जनतेने कोरोनाला घाबरून न जाता शासन नियमांचे पालन करा: शंकरराव गडाख

जनतेने कोरोनाला घाबरून न जाता शासन नियमांचे पालन करा: शंकरराव गडाख

 

नेवासा  : नेवासा तालुक्यातील जनतेने कोरोनाला घाबरून न जाता शासन नियमांचे पालन करून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी सज्ज व्हा. शनिशिंगणापूर येथे पुढील उपचाराच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली असल्याची माहिती जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

 

नेवासा येथील कोविड केयर सेंटरला मंत्री शंकरराव गडाख यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संदर्भात व कोरोनाबाबत अंमलबजावणी व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला.

 

नेवासा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी नेवासा तालुक्यातील कोरोनाच्या सद्य स्थितीबाबत माहिती दिली. तसेच प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसीलदार रुपेश सुराणा यांनी ठोस उपाय योजना करण्याच्या दुष्टीने सूचना केल्या.

 

यावेळी झालेल्या बैठकीप्रसंगी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, गटविकास अधिकारी शेखर शेलार, नगरपंचायतचे मार्गदर्शक सतीश पिंपळे, मुख्याधिकारी समीर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र कानडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मच्छिंद्र बनसोडे, कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे,नेवासा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: People should not be afraid of Corona and follow government rules: Shankarrao Gadakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.