मंदिरे उघडण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:22 AM2021-08-29T04:22:36+5:302021-08-29T04:22:36+5:30

अहमदनगर : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून ...

People should take to the streets to open temples | मंदिरे उघडण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरावे

मंदिरे उघडण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरावे

अहमदनगर : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोना वाढत नाही का ? सात्विक विचारातून माणसे घडत आहेत, अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ? असा संतापजनक सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरावे, त्या आंदोलनात मी स्वत: सहभागी होईल, अशी ग्वाही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

अहमदनगर येथील मंदिर बचाव कृती समितीने शनिवारी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी समितीने मंदिरे उघडण्यासाठी अण्णांना साकडे घातले. यावेळी मंदिर बचाव कृती समितीचे प्रमुख वसंत लोढा, सुनील पंडित, बाळासाहेब भुजबळ, बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे, गणेश पलंगे आदी उपस्थित होते.

समितीशी चर्चा केल्यानंतर अण्णा हजारे म्हणाले, भरकटत चाललेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात, यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. माझे वय आज ८४ झाले आहे. मात्र, माझ्या सबंध आयुष्यावर छोटासाही डाग नाही. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीजवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालो आहे. संतांचे विचार देणारी मंदिरे का बंद केली ? सरकारला संतांचे विचार काय समजले ? त्यामुळे सरकारने आपले धोरण बदलून त्वरित मंदिरे उघडावीत, अशा भाषेत अण्णांनी सरकारला मंदिरे उघडण्याबाबत सूचना केली. यावेळी हजारे यांना दिलेल्या निवेदनावर नगर येथील विशाल गणपती मंदिराचे अध्यक्ष अभय आगरकर व शिर्डी साईबाबा देवस्थानचे माजी ट्रस्टी सचिन तांबे यांचीही सही आहे.

---

फोटो- २८ अण्णा हजारे

राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यासाठी अहमदनगर येथील मंदिर बचाओ कृती समितीच्या वतीने शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन दिले. समवेत सुनील पंडित, बाळासाहेब भुजबळ, बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे, गणेश पलंगे आदी.

Web Title: People should take to the streets to open temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.