बनावट कागदपत्रांद्वारे मिळविली खडी क्रशरची परवानगी

By Admin | Published: May 18, 2017 02:16 PM2017-05-18T14:16:58+5:302017-05-18T14:16:58+5:30

बनावट ना हरकत दाखला तयार करुन २०१६ साली खडीक्रशरची परवानगी मिळविल्याची बाब तत्कालिन सरपंच शिवाजी गायकवाड यांच्या प्रतिज्ञापत्रावरुन उघडकीस आली आहे़

Permissible crush crushers obtained by counterfeit documents | बनावट कागदपत्रांद्वारे मिळविली खडी क्रशरची परवानगी

बनावट कागदपत्रांद्वारे मिळविली खडी क्रशरची परवानगी

आॅनलाईन लोकमत
चिचोंडी पाटील, दि़ १८ - नगर तालुक्यातील उक्कडगाव येथील खडीक्रशर चालकाने २०११ सालचा उक्कडगाव ग्रामपंचायतचा बनावट ना हरकत दाखला तयार करुन २०१६ साली खडीक्रशरची परवानगी मिळविल्याची बाब तत्कालिन सरपंच शिवाजी गायकवाड यांच्या प्रतिज्ञापत्रावरुन उघडकीस आली आहे़
उक्कडगावचे तत्कालिन सरपंच शिवाजी गायकवाड यांनी खडीक्रशरसाठी २०११ साली ना हरकत दाखला दिलाच नव्हता असे प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे़ उक्कडगावात खडीक्रशरवरुन वाद सुरु आहेत़ त्यामुळे गायकवाड यांनी ग्रामपंचायतीला प्रतिज्ञापत्राद्वारे खडीक्रशरला परवानगी नाकारल्याचे सांगितले आहे़ या प्रतिज्ञापत्रात गायकवाड यांनी म्हटले आहे, मी २००७ साली वार्ड क्रमांक एकमधून सदस्य म्हणून निवडणून आलो व २००७ ते २०१२ या कालावधीतसाठी मी सरपंच पदावर काम पाहिले़ या कालावधीत मी खडीक्रशरसाठी ग्रामपंचायतमार्फत कुठलाही ना हरकत दाखला दिला नाही, तसेच खडीक्रशर मालकांनी बनावट ना हरकत दाखला तयार करून त्यावर माझ्या सहीची नक्कल मारली आहे़ या बनावट ना हरकत दाखल्याद्वारे खडीक्रशर चालकांनी २०१६ मध्ये परवानगी मिळवून शासनाची फसवणूक केली आहे़
खडीक्रशर चालकांनी ना हरकत दाखले बनावट बनवल्याचे माजी सरपंच शिवाजी गायकवाड यांनी प्रतिज्ञापत्रावर ग्रामपंचायतला लेखी दिले आहे़ यावरून शासनाची फसवणूक करुन खडीक्रशरला परवानगी मिळल्याचे सिद्ध होत आहे़ त्यामुळे हे खडीक्रशर त्वरीत बंद करण्यात यावे़ ग्रामस्थांनाही या खडी क्रशरचा मोठा त्रास होत असून त्यांच्या हातून काही विपरीत घडल्यास यास प्रशासन स्वत: जबाबदार राहील, असे उक्कडगावचे विद्यमान सरपंच नवनाथ म्हस्के यांनी सांगितले़

Web Title: Permissible crush crushers obtained by counterfeit documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.