४ हजार २०० बेडचे जम्बो कोविड रुग्णालयास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:36+5:302021-05-09T04:21:36+5:30

झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या व अपुरी पडणारी उपचार यंत्रणा या पार्श्वभूमीवर खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत संस्थांकडे असलेल्या पायाभूत सुविधांकडे ...

Permission for 4,200 bed Jumbo Covid Hospital | ४ हजार २०० बेडचे जम्बो कोविड रुग्णालयास परवानगी

४ हजार २०० बेडचे जम्बो कोविड रुग्णालयास परवानगी

झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या व अपुरी पडणारी उपचार यंत्रणा या पार्श्वभूमीवर खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत संस्थांकडे असलेल्या पायाभूत सुविधांकडे लक्ष वेधत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिर्डीत ४,२०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. या प्रस्तावाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीने मान्यता दिली असल्याचे लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी शिवसेनेचे कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी व नेवासा, तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व येवला आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर अशा दहा तालुक्यातील रुग्णांसाठी हे कोविड रुग्णालय उपयोगी ठरणार आहे.

साईसंस्थानचे ५०० बेडचे हॉस्पिटल आहे. साई आश्रम १ व २ या भक्तनिवासातील रूम उपलब्ध आहेत. यामुळे शिर्डीत २,००० ऑक्सिजन बेड, २,००० बेडचे कोविड सेंटर व २०० आयसीयू बेड असे जम्बो कोविड सेंटर चालू करण्यास राज्य शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक निर्णय घेत, विधि व न्याय विभागास शिर्डी येथे जम्बो कोविड सेंटर चालू करण्यास आदेश दिले. ७ मे, २०२१ रोजी विधि व न्याय विभागाने साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ४,२०० बेडचे कोविड सेंटर चालू करण्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले.

Web Title: Permission for 4,200 bed Jumbo Covid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.