भगवानगडावरील दसरा मेळाव्यास परवानगी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 05:43 PM2017-09-28T17:43:50+5:302017-09-28T17:48:09+5:30
पाथर्डी : तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे़ तर पंकजा मुंडे समर्थकांनी महंताचा व प्रशासनाचा निषेध ...
पाथर्डी : तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे़ तर पंकजा मुंडे समर्थकांनी महंताचा व प्रशासनाचा निषेध करत मेळावा गडावरच घेणार केला आहे़ त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
तहसीलदार नामदेव पाटील यांनी परवानगी नाकारत असल्याचे पत्र दसरा मेळावा कृती समितीच्या सदस्यांना गुरुवारी सुपूर्द केले. परवानगी नाकारताना भगवानगड न्यास, वनविभाग, खरवंडी तसेच भारजवाडी ग्रामपंचायत, महंत नामदेव शास्त्री यांचा अभिप्राय यांचा हवाला या पत्रात दिला आहे़ तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे़ पंकजा मुंडे समर्थकांनी महंताचा व प्रशासनाचा निषेध करत मेळावा गडावरच घेणार, असा निर्धार केला.