निवासाकरिता परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:25+5:302021-02-13T04:20:25+5:30
सफाई कर्मचाऱ्यांचे गेल्या काही महिन्यांचे रखडलेले वेतन त्वरित अदा करावे, वैद्यकीय बिलांची सुविधा मिळावी, कर्मचाऱ्यांच्या निवासाकरिता परवानगी द्यावी, शासकीय ...
सफाई कर्मचाऱ्यांचे गेल्या काही महिन्यांचे रखडलेले वेतन त्वरित अदा करावे, वैद्यकीय बिलांची सुविधा मिळावी, कर्मचाऱ्यांच्या निवासाकरिता परवानगी द्यावी, शासकीय गणवेश देण्यात यावा, शासकीय सदनिका उपलब्ध कराव्या, पगाराची पत्रके द्यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. यातील सर्वच मुद्द्यांवर मुख्याधिकारी शिंदे यांनी सकारात्मक लेखी आश्वासन दिले. पुढील सर्वसाधारण सभेमध्ये या मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याची लेखी ग्वाही देण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेकेदाराने मुदतीपूर्वीच काम सोडून पळ काढला. त्यामुळे कर्मचार्यांच्या वेतनाचा तिढा निर्माण झाला आहे. जिल्हाधिकार्यांच्या परवानगीने त्यावर कार्यवाही केली जाईल, तसेच निवृत्ती वेतन विक्री व देय रकमाकंरिता वाढीव अनुदानाची मागणी पालिका संचालनालयाकडे करण्यात आली आहे, असे लेखी पत्र चव्हाण यांना देण्यात आले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
----------
फोटो ओळी : पालिका आंदोलन
पालिकेच्या प्रवशद्वारासमोर नगरसेविका प्रणिती चव्हाण यांनी सुरू केलेले आंदोलन मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
----------