साडेतीन कोटींचा पी.एफ. थकविला : नगर तालुका बाजार समिती

By मिलिंदकुमार साळवे | Published: January 22, 2019 01:09 PM2019-01-22T13:09:05+5:302019-01-22T13:10:52+5:30

अहमदनगर कृषी उत्पन बाजार समितीने २००९-१० पासून जवळपास दहा वर्षांचा कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी थकविल्याची बाब उघडकीस आली आहे.

P.f. 3.5 trillion Thakavya: Nagar taluka market committee | साडेतीन कोटींचा पी.एफ. थकविला : नगर तालुका बाजार समिती

साडेतीन कोटींचा पी.एफ. थकविला : नगर तालुका बाजार समिती

मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : अहमदनगर कृषी उत्पन बाजार समितीने २००९-१० पासून जवळपास दहा वर्षांचा कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी थकविल्याची बाब उघडकीस आली आहे.
बाजार समितीच्या आर्थिक व्यवहार व भविष्य निर्वाह निधीबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सहकारी संस्थांचे विशेष लेखापरीक्षक वर्ग-२ (फिरते पथक) एस. डी. कुलकर्णी यांना बाजार समितीने कर्मचाºयांच्या वेतनातून कपात केलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेबाबतच्या मुद्याची फेरचौकशी करण्यासाठी प्राधिकृत केले होते. कुलकर्णी यांनी याबाबत चौकशी करून आपला अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर केला आहे.
समिती कर्मचाºयांच्या वेतनातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बचत खाते उघडून त्या खात्यात भरणा करीत आहे. पण ही कपात केलेली रक्कम वेळच्या वेळी भरणा केलेली नाही. सन २००९-१० पासूनची कपात केलेली रक्कम भरणा करणे बाकी आहे. तसेच बाजार समितीच्या हिश्याची रक्कम सन २००३-२००४ पासून तरतूद करून ती देणे दर्शविलेली आहे. ती देखील भरणा करणे बाकी आहे.

अहवालातील निष्कर्ष
अहमदनगर बाजार समितीने कर्मचाºयांच्या पगारातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम तसेच बाजार समितीच्या हिश्याची रक्कम भरणा करणे बाकी आहे. समितीने तिच्या आर्थिक अडचणीमुळे रक्कम थकीत असल्याचे मान्य केलेले आहे. भविष्य निर्वाह निधीच्या व्यवहारात अपहार, अफरातफर,गैरविनियोग झाल्याचे दिसून येत नाही, असा निष्कर्ष विशेष अहवालात नोंदविण्यात आला आहे. तसेच थकीत असलेली रक्कम भरणा करण्याबाबत बाजार समितीस निर्देश देणे आवश्यक राहील,अशी शिफारसही कुलकर्णी यांनी केली आहे.

दादा पाटील शेळकेंचा प्रतिसाद नाही
माजी खासदार दादा पाटील शेळके व इतरांनी याबाबत तक्रार केली होती. तसेच ३ आॅक्टोबर २०१८ रोजी ठिय्या आंदोलन केले होते. तक्रारीबाबत म्हणणे मांडण्यासाठी चौकशी अधिका-यांनी शेळकेंना पत्र पाठविले होते. पण त्यांनी चौकशीस प्रतिसाद दिला नाही.

३१ मार्च २०१८ अखेर कर्मचा-यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम
१ कोटी २० लाख ४६ हजार १७९ रूपये

तसेच बाजार समितीचा भविष्य निर्वाह निधीचा हिस्सा
२ कोटी ३० लाख ५८ हजार ११४ रूपये
भरणा करणे बाकी असल्याचे अहवालातून निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

 

 

Web Title: P.f. 3.5 trillion Thakavya: Nagar taluka market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.