दानशूर व्यक्तींनी कोविड केअर सेंटरला मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:19 AM2021-04-12T04:19:07+5:302021-04-12T04:19:07+5:30
भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्तनिवासामध्ये सुरू असलेल्या शासकीय कोविड केअर सेंटरकरिता पंचगंगा सिड्सने १०० बेड दिले. पंचगंगा सिड्सचे संचालक ...
भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्तनिवासामध्ये सुरू असलेल्या शासकीय कोविड केअर सेंटरकरिता पंचगंगा सिड्सने १०० बेड दिले. पंचगंगा सिड्सचे संचालक काकासाहेब शिंदे यांनी भेंडा येथे तहसीलदार सुराणा यांच्याकडे १०० बेड्स सुपूर्द केले.
यावेळी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, डॉ. भाग्यश्री सारूक, डॉ. योगेश साळुंके, बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे उपस्थित होते.
सुराणा म्हणाले, भेंडा कोविड केअर सेंटरमध्ये १६२ रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्णांना बेड शिल्लक नव्हते. अडचण ओळखून शिंदे यांनी १०० बेड्स दिले आहेत. त्यामुळे येथील एकूण बेड संख्या २५० इतकी झाली आहे. बेड्सबरोबरच गॅस सिलिंडर, मास्क, सॅनिटायझरचीसुद्धा आवश्यकता आहे. तालुक्यात रुग्णवाहिका कमी पडत आहेत. रुग्णवाहिकांची मदत करावी. रोख रक्कम न देता दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन वस्तू रूपाने मदत करावी.